शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

विद्यार्थी संघटनांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी अधिसभेवर घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:09 AM

Shivaji University, Student, Education Sector, kolhapur विद्यार्थी परिषदांमध्ये प्रतिनिधित्वासाठी संशोधन आणि विकास या स्वतंत्र विभागाचा समावेश करावा. विद्यार्थी परिषद आणि अधिसभा सदस्य म्हणून जाण्यासाठी राष्ट्रीय दर्जा असणाऱ्या पक्षांच्या अधिकृत विद्यार्थी संघटनांनी नामनिर्देशित केलेले विद्यार्थी प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशा विविध सूचना विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठात केल्या.

ठळक मुद्देविद्यार्थी संघटनांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी अधिसभेवर घ्यावेत विविध सूचना : विद्यापीठ कायदा उपसमितीला सादर

 कोल्हापूर : विद्यार्थी परिषदांमध्ये प्रतिनिधित्वासाठी संशोधन आणि विकास या स्वतंत्र विभागाचा समावेश करावा. विद्यार्थी परिषद आणि अधिसभा सदस्य म्हणून जाण्यासाठी राष्ट्रीय दर्जा असणाऱ्या पक्षांच्या अधिकृत विद्यार्थी संघटनांनी नामनिर्देशित केलेले विद्यार्थी प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशा विविध सूचना विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठात केल्या.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम - २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती ही उपसमिती स्थापन केली आहे. या समितीने मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या.अभिषेक मिठारी यांनी विद्यार्थी परिषदांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी असावेत. व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यार्थी परिषद अध्यक्ष हा निमंत्रित असण्याऐवजी पदसिद्ध सदस्य असावा. विद्यार्थी परिषदांमध्ये अपंग आणि एलजीबीटीक्यू घटकांचे प्रतिनिधित्व असावे, आदी सूचना मांडल्या. मनविसेचे मंदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना केंद्र मानून नवीन कायदे व्हावेत, असे सांगितले.

ऋतुराज माने यांनी विद्यार्थी परिषद आणि अधिसभा यांच्यावर सदस्य म्हणून जाण्यासाठी राष्ट्रीय दर्जा असणाऱ्या पक्षांच्या अधिकृत विद्यार्थी संघटनांनी नामनिर्देशित केलेले विद्यार्थी प्रतिनिधी घेतले जावेत, अशी सूचना मांडली.

दहावी, बारावी, पदवी शिक्षण यांमध्ये जसे क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांसाठी विशेष कोटा असतो तसा कोटा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही असावा, अशी सूचना महेश राठोड यांनी केली. यावेळी सिद्धांत गुंडाळे, राजवर्धन बिरंजे, आदी उपस्थित होते.अकरा प्राधिकरणांवर प्रतिनिधी नेमावेतविद्यापरिषद, विद्याशाखा, विद्यापीठ उपपरिसर मंडळ, अभ्यास मंडळे, आजीवन अध्ययन व विस्तार, परीक्षा व मूल्यमापन, माहिती व तंत्रज्ञान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहचर मंडळ, नवोपक्रम व संशोधन मंडळ, आदी ११ प्राधिकरणांवर विद्यार्थी प्रतिनिधी नेमावेत, आदी विविध २४ सूचना विद्यार्थ्यांनी मांडल्या.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर