शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी दरवाढ समितीवर प्रतिनिधित्व द्या

By admin | Updated: February 13, 2015 23:48 IST

ऊसतोड दरप्रश्न : वाहतूक संघटना व कृषी अधिकाऱ्यांची मागणी

सतीश पाटील- शिरोली -ऊसतोड मजूर मुकादमांकडून राज्यातील ऊस वाहतूकदार मालकांची २०० कोटींची फसवणूक झाली आहे. म्हणूनच ऊसतोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीवर ऊस वाहतूकदार व कारखान्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी वाहतूक संघटना व कृषी अधिकारी यांनी केली आहे.
राज्यात चालू वर्षी सहकारी आणि खासगी असे १७१ साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना ऊस पुरविण्यासाठी सुमारे ३९ हजार वाहतूकदार आहेत. या वाहतूकदारांनी ऊस तोडण्यासाठी टोळींना पाच लाखांपासून आठ लाखांपर्यंतची रक्कम अ‍ॅडव्हान्स रूपात दिली आहे. राज्यातील वाहतूकदारांनी चालूवर्षी चार हजार कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स रूपात वाटले आहेत; पण पाच ते आठ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊन अनेक ऊसतोड मजुरांनी व मुकादमांनी पोबारा केला आहे. त्यातून वाहनचालकांना २०० कोटींना गंडा घातला गेला. कोल्हापुरातील सुमारे १६० वाहनचालकांना नऊ कोटींना फसविले आहे. हे मजूर पैसे घेतात; पण प्रत्यक्ष ऊसतोडणीसाठी येतच नाहीत. त्यामुळे दरवर्षी वाहतूकदारांनाच हा लाखो रुपयांचा फटका बसतो आहे. हे बुडालेले पैसे वाहतूकदाराला शासनही देत नाही आणि साखर कारखानाही देत नाही. वाहतूकदारांनी सावकार, बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज स्वरूपात पैसे काढलेले आहेत. हे पैसे बुडाल्याने वाहतूकदार आत्महत्या करू लागले आहेत. म्हणूनच या गोष्टीला आळा बसण्यासाठी तोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीमध्ये वाहतूकदार प्रतिनिधी आणि तांत्रिक सल्लागार म्हणून साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यांचा समावेश प्रतिनिधी म्हणून करून घ्यावा, अशी वाहतूकदार संघटनेची मागणी आहे. याबाबतचे निवेदनही सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांना दिले आहे.


ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्याकडून वाहतूकदारांची फसवणूक होत अहे. ही फसवणूक थांबविण्यासाठी आणि या प्रकाराला आळा बसण्यासाठी वाहतूकदार प्रतिनिधी अणि कारखान्याचा कृषी अधिकारी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून घ्यावे.
- सुधाकर पाटील,
कृषी अधिकारी,
शरद साखर कारखाना, नरंदे.


मुंबईत १६ रोजी बैठक
ऊस तोडणी मजुरांची दराबाबत मुंबईत १६ फेब्रुवारीला बैठक होत आहे. यावेळी या ऊसतोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीमध्ये वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी व कृषी अधिकारी यांचा समावेश करून घ्यावा, अशी वाहतूक संघटनेची मागणी आहे.