शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला ‘लोकसभे’ची पुनरावृत्ती

By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST

राजू सावंत यांचा इशारा : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास वेगळे परिणाम

 कोल्हापूर : महागाई, भ्रष्टाचारासह विविध कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. यामध्ये मराठा समाजाला दाखविलेले आरक्षणाचे गाजर हे प्रमुख कारण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी याबाबत निर्णय न घेतल्यास कॉँग्रेस आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज, शुक्रवारी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी दिला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य व केंद्र सरकारची महागाई कमी करण्याबाबतची उदासीनता, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारीचे मोठे प्रमाण, वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार याचबरोबर मराठा समाजाला आरक्षणाचे दाखविलेले गाजर, आदी कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची पीछेहाट झाली आहे. यातून मराठा समाजाचा रोष पत्करण्याची वेळ व ढग फाटल्यावर होणार्‍या अवस्थेसारखी परिस्थिती महाराष्ट्र सरकारवर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी योग्य तो बोध घेऊन शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गेली २५ ते ३० वर्षे महाराष्टÑातील बहुसंख्येने असलेला गरीब मराठा समाज लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करीत आहे; परंतु आयोग नेमणे, समाजाचा आर्थिक व सामाजिक सर्व्हे करणे, आरक्षण तत्त्वत: मान्य करणे, आदी अनेक कारणे समाजाला दाखविली आहेत. कोणा समाजावर अन्याय करून आम्हाला आरक्षण द्या, अशी कोणतीही मराठा समाजाच्या नेत्यांची भावना नाही. परंतु सरकार याविषयी चालढकल करत आहे. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या व आरक्षण चळवळीत सातत्याने पाठपुरावा करणार्‍या विविध संघटनांना आगामी काळात एकत्रित करून मराठा आरक्षण या एकाच जाहीरनाम्यावर उमेदवार उभे करण्यासाठी अत्यंत गांभीर्याने चाचपणी केली जाणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)