सीपीआरमधील एड्स प्रतिबंध कक्षाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:28+5:302021-01-21T04:22:28+5:30

कोल्हापूर : सीपीआरमधील एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे नूतनीकरणानंतर पूर्णपणे रुपडे पालटले आहे. कॉम्युटर, फ्रीज, केबीनसह रंगरंगाेटी करुन सज्ज ...

Renewal of AIDS Prevention Cell in CPR | सीपीआरमधील एड्स प्रतिबंध कक्षाचे नूतनीकरण

सीपीआरमधील एड्स प्रतिबंध कक्षाचे नूतनीकरण

कोल्हापूर : सीपीआरमधील एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे नूतनीकरणानंतर पूर्णपणे रुपडे पालटले आहे. कॉम्युटर, फ्रीज, केबीनसह रंगरंगाेटी करुन सज्ज झालेला हा कक्ष आजपासून नव्या जोमाने नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन आज (गुरुवारी) संध्याकाळी चार वाजता इंडो कौंउन्टचे कार्यकारी व्यवस्थापक कमल मित्रा व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सीपीआरमध्ये २००९पासून एड्स प्रतिबंध व नियंत्रण नावाने कक्ष सुरु आहे. जुन्या इमारतीत असलेल्या या कक्षाची काहीशी दुरवस्था झाली होती. इंडो कौउंन्ट फाऊंडेशनने सीएसआर अर्थात सामाजिक दायित्व निधीतून या कक्षाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. या कक्षातील रंगरंगोटी, सुशोभिकरणापासून ते केंद्राला लागणारे १५ कॉम्प्युटर व १२ फ्रीजही दिले आहेत. नेहमी या विभागाला लागणारे साहित्य हे जिल्हा नियोजन समितीकडूनच दिले जाते. २०१७पूर्वी २५ लाख आणि त्यानंतर ७ लाख रुपये देण्यात आले. यातून कक्षाचे काम अद्ययावत ठेवण्यात यश आले आहे. या उद्घाटनाचे निमित्त साधून दरवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक यावेळी या नूतनीकरण झालेल्या कक्षात होणार आहे.

Web Title: Renewal of AIDS Prevention Cell in CPR