शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलसचिवांचाही अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:16 IST

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी कुलसचिवांचाही अर्जविद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांचे ऑनलाईन अर्ज

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे.या पदासाठी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या अधिकारी अथवा प्राध्यापकांनी अर्ज करावयाचा असल्यास त्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावी लागते. त्यानुसार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नांदवडेकर, माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह विविध अभ्यासक्रमांच्या एकूण बारा प्राध्यापकांनी एनओसी घेतली आहे. त्यात ‌वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. ए. एम. गुरव, एस. एस. महाजन, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एस. एस. चव्हाण, आदींचा समावेश आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

डॉ. नांदवडेकर हे दि. १८ नोव्हेंबर २०१६ पासून कुलसचिव पदावर कार्यरत आहेत. या पदावर रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (एमसीए) संचालक म्हणून कार्यरत होते. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपली आहे. या अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) जमा करण्याची मुदत शुक्रवार (दि. १०) जुलैपर्यंत आहे. दरम्यान, याबाबत डॉ. नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एनओसी घेतली असून, ऑनलाईन अर्ज केला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर