Kolhapur: रिल्स ठरले खुनाचे कारण; शिरोळमधील खुनाचा उलगडा, सांगलीचे दोघे अल्पवयीन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:54 IST2025-05-21T16:52:18+5:302025-05-21T16:54:20+5:30
जयसिंगपूर : मोबाइल स्टेटस वर खुन्नस देणारे रिल्स का ठेवता, असे विचारल्याच्या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी शिरोळ येथे राजू ...

मृत राजू कोलप
जयसिंगपूर : मोबाइल स्टेटस वर खुन्नस देणारे रिल्स का ठेवता, असे विचारल्याच्या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी शिरोळ येथे राजू मुरलीधर कोलप (वय ३२, रा. निलजी बामणी, ता. मिरज, जि. सांगली) याचा खून झाल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. दरम्यान खूनप्रकरणी सांगलीच्या दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
शिरोळ- कनवाड मार्गावर धारदार शस्त्राने वीटभट्टी कामगाराचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. मंगळवारी शिरोळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. एका अल्पवयीन मुलाने मोबाइलवर स्टेटसवर खुन्नस देणारे रिल्स ठेवले होते. असे रिल्स का ठेवले आहे याचा जाब कोलप याने त्याला विचारल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता.
यातूनच सांगलीच्या एक अल्पवयीन व अन्य एक अल्पवयीन अशा दोघांनी शिरोळ येथे धारदार व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली. या दोघांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.