शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लालचुटूक गाजर, हिरवागार हरभरा

By admin | Updated: December 1, 2014 00:08 IST

आठवडी बाजार : कांदा, तेल, साखर घसरले; हरियाणा, पंजाबच्या माल्टाचे आकर्षण, मार्गशीर्षमुळे फळांची रेलचेल

कोल्हापूर : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरकी तेल, साखरेसह कडधान्य मार्केटमध्ये कमालीची मंदी जाणवत असून दरही घसरले आहेत. किरकोळ बाजारात लहान (एस) साखर २८ रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्यांच्या दरात चढ-उतार कायम असून हरभरा व गाजरांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. संत्री, माल्टा व बोरांनी फळ मार्केट अक्षरश: फुलून गेला आहे. मार्गशिर्ष महिन्यामुळे पूजेसाठी विविध फळांची आवक वाढली आहे. दोन आठवडे भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो कमालीचा घसरला होता. घाऊक बाजारात अडीच रुपये किलोपर्यंत टोमॅटो खाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या आठवड्यात दरात थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाली असून ६ रुपयांपर्यंत दर राहिला आहे. ढब्बू, गवार, कोथिंबीरच्या दरात वाढ झाली असून, वांगी, ओला वाटाणा, भेंडी, वरणा, दोडक्याचा तुलनात्मकदृष्ट्या दर कमी झाला आहे. हरभऱ्याची आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात हरभरा पेंडी सहा रुपये, तर मेथी आठ रुपये पेंडी आहे. गुळाची आवक वाढली असून, दर स्थिर आहेत. सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३१०० ते ३४५० पर्यंत दर मिळत आहे. बटाट्याची आवक स्थिर राहून दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा निम्याने दर खाली आला आहे. मार्गशीर्ष महिना असल्याने प्रत्येक गुरुवारी घरोघरी पूजा होत असल्याने बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व प्रकारच्या फळांची रेलचेल संत्री, बोरे व माल्टा आवक वाढली आहे. हरियाणा, पंजाब येथून माल्टाची तर सांगोला, पंढरपूर येथून ‘चमेली’, ‘उमराण’ व ‘कडाका’ या बोरांची आवक सुरू आहे. डाळिंबचा हंगाम अंतिम टप्प्यात असून आवक घटल्याने दरात सरासरी ४० टक्के वाढ झाली आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात द्राक्षे दिसतात, पण यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने अद्याप आवक झालेली नाही. (प्रतिनिधी)कांदा पुन्हा घसरलागेल्या आठवड्यात कोल्हापुरात कांद्याची आवक सरासरी ६८९३ पोत्यांची होती. पण या आठवड्यात त्यात वाढ होऊन ती ९९५४ पोत्यापर्यंत झाल्याने त्याचा कांद्याच्या दरावर परिणाम झाला. सरासरी चौदा रुपयांचा कांदा बारा रुपयांपर्यंत खाली आला आहे. अंडी वधारलीथंडी सुरू झाल्याने अंड्यांची मागणी वाढली असून, किरकोळ बाजारात एका अंड्याचा दर पाच रुपयांपर्यंत गेला आहे. गोव्यातून अंड्यांची मागणी अधिक असल्याने मार्केट एकदमच उचलल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून आगामी महिन्याभरात सहा रुपयांपर्यंत दर जाऊ शकतो.