भाजपने संधी दिल्यास लोकसभा लढवण्यास तयार- प्रकाश आवाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:01 IST2026-04-28T15:00:33+5:302026-04-28T15:01:06+5:30

कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य

Ready to Contest Lok Sabha Election if BJP Gives the Opportunity says Prakash Awade | भाजपने संधी दिल्यास लोकसभा लढवण्यास तयार- प्रकाश आवाडे

भाजपने संधी दिल्यास लोकसभा लढवण्यास तयार- प्रकाश आवाडे

इचलकरंजी: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी दिली तर आपण लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत, असे मत माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजप कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

हातकणंगले मतदारसंघ शिंदेसेनेकडे असताना २०२९च्या निवडणुकीसंदर्भात आवाडे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आगामी राजकीय घडामोडीमधील उलथापालथीचे संकेत असल्याचेही मानले जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदेसेनेकडे आहे. खासदार धैर्यशील माने हे या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मागील पंचवार्षिक कारकीर्दीतील धैर्यशील माने, रवींद्र माने आणि तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्यात चांगलीच धुसफूस होती, परंतु राहुल आवाडे निवडून आल्यानंतर त्यांनी आणि खासदार माने यांनी बऱ्यापैकी जुळवून घेतले आहे. या दोघांचे चांगलेच जुळल्यामुळे रवींद्र माने हे थोडेफार बाजूला पडल्याचेही दिसून येते. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सध्या जाणवत असले तरी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन माने-आवाडे हा जुना राजकीय संघर्ष पुढील काळात नव्याने निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

मेळाव्यानंतर माध्यमासमोर बोलताना आवाडे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा अशी वरिष्ठ पातळीवर मागणी केल्याचेही सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष वाढीसाठी मागणी करणे योग्य असल्याचा निर्वाळाही त्यांनी हिडीओमध्ये दिला आहे. यासंदर्भात वरिष्ठ नेते, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबतही बोलणे झाल्याचे म्हटले आहे. २०२९ साली भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत अमुल्याचीही चर्चा सुरू आहे.

Web Title : भाजपा से मौका मिला तो लोकसभा लड़ने को तैयार: प्रकाश आवाडे

Web Summary : भाजपा से उम्मीदवारी मिलने पर प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभा सीट से चुनाव लड़ने के इच्छुक। उनके बयान से राजनीतिक बदलाव के संकेत, मौजूदा गठबंधनों के बावजूद पुरानी प्रतिद्वंद्विता फिर उभर सकती है।

Web Title : Prakash Awade Ready to Contest Lok Sabha if BJP Offers Ticket

Web Summary : Ex-MLA Prakash Awade eyes Hatkanangale Lok Sabha seat if BJP nominates him. His statement hints at political shifts, potentially reigniting old rivalries despite current alliances.