‘रयत’ इतर व्यवसायात संधी शोधणार :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:28+5:302021-02-05T06:54:28+5:30

कोपार्डे : रयत कृषी उद्योग समूहाने मिश्र खत उत्पादनात दर्जा राखण्यासाठी तडजोड केलेली नाही. खासगी खत विक्रेत्यांची मोठी ...

Rayat will look for opportunities in other businesses: | ‘रयत’ इतर व्यवसायात संधी शोधणार :

‘रयत’ इतर व्यवसायात संधी शोधणार :

कोपार्डे : रयत कृषी उद्योग समूहाने मिश्र खत उत्पादनात दर्जा राखण्यासाठी तडजोड केलेली नाही. खासगी खत विक्रेत्यांची मोठी स्पर्धा असताना तिला तोंड देत स्पर्धेत आजही टिकण्यात यशस्वी झालो आहोत. भविष्यात शाखाविस्तार व इतर व्यवसायांत संधी शोधणार असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघाच्या ५८व्या वार्षिक सभेत विश्वास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नेमगोंड पाटील होते. व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी अहवाल व विषयवाचन केले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी अरविंद देसाई यांचा गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला; तर चांगली विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांना १०० रुपये प्रतिटन अनुदान रोख देण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा माधुरी जाधव, संचालक कुंडलिक पाटील, शिवाजी देसाई, चिंतामणी गुरव, आनंदराव यादव, सचिन पाटील, दशरथ पाटील, शिवाजी भोसले, मारुती मोरे उपस्थित होते.

फोटो :

रयत कृषी उद्योग समूहाच्या ५८ व्या वार्षिक सभेत बोलताना ‘गोकुळ’चे माजी आध्यक्ष विश्वास पाटील, शेजारी संघाचे अध्यक्ष नेमगोंड पाटील, आनंदराव यादव, उपाध्यक्षा माधुरी जाधव, संचालक कुंडलिक पाटील, चिंतामणी गुरव, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते. (छाया : जयवंत निगडे)

Web Title: Rayat will look for opportunities in other businesses: