पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रॅपिड ॲंटिजेन टेस्टला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:16+5:302021-04-27T04:25:16+5:30

कॅम्पचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व कार्यकारी अभियंता एस.डी. मोरे, उपअभियंता, बी.आर. ...

Rapid antigen test begins in a five-star industrial estate | पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रॅपिड ॲंटिजेन टेस्टला सुरुवात

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रॅपिड ॲंटिजेन टेस्टला सुरुवात

कॅम्पचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व कार्यकारी अभियंता एस.डी. मोरे, उपअभियंता, बी.आर. प्रभावळकर, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, उपाध्यक्ष संजय पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांनी त्यांनी कोविडच्या अनुषंगाने मॅकच्या वतीने कामगारांच्या करिता रॅपिड अँटिजन टेस्ट, व्हॅक्सिनेशन कॅम्प व शिवभोजन थाळी उपक्रम आजपासून सुरू करीत असल्याचे सांगितले. संस्थेकडे सदर कॅम्पसाठी ३०० पेक्षा जास्त उद्योजक व कर्मचाऱ्यांची नोंद झालेली आहे.

कार्यकारी अभियंता एस.डी. मोरे यांनी मॅकने शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्वरित कॅम्पचे व शिवभोजन थाळीचे आयोजन कामगार व गरजू व्यक्तींसाठी केल्याबद्दल मॅकचे आभार मानले व हा मॅकने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे असे सांगितले.

कार्यक्रमास मॅकचे संचालक मोहन कुशिरे, संजय जोशी, विठ्ठल पाटील, अमृतराव यादव, निमंत्रित सदस्य भावेश पटेल, कुमार पाटील, सुरेश क्षीरसागर, मुबरक शेख, विशाल कामते, शिवाजी भोसले, डाॅ. मनीषा कुलकर्णी, डॉ. महादेव माने, उपस्थित होते.

२६ कागल

फोटो कॅप्शन : पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल हातकणंगले येथे मॅकच्या वतीने कामगार, उद्योजक यांच्यासाठी रॅपिड ‌अँटिजन टेस्ट व व्हॅक्सिनेशन कॅम्प व शिवभोजन थाळीचे शुभारंभप्रसंगी औद्योगिक महामंडळाचे अधिकारी व मॅकचे पदाधिकारी.

Web Title: Rapid antigen test begins in a five-star industrial estate