शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा, परताळा बुजविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: April 10, 2015 00:34 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : रात्री खरमाती टाकण्याचे काम; बांधकाम व्यावसायिकांचे कृत्य, मनपाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा व रंकाळ्याचा श्वास असलेला परताळा परिसरात रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात खरमाती टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. परिसरातील बांधकाम व्यावसायिकांचे हे कृत्य असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने रंकाळाप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे. रंकाळ्यातील दूषित पाण्याची पातळी कमी करण्यासाठी महापालिकेने आठ लाख रूपये खर्चून सांडव्याच्या बाजूला चर मारली. या चरीशेजारीच अज्ञातांनी तब्बल दहा ते बारा डंपर खरमाती आणून टाकली आहे. खरमाती टाकत असताना रंकाळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले तारेची कुंपणही तोडून काढले आहे. थेट रंकाळ्यातच खरमाती टाकल्याचे प्रकार अद्याप महापालिका प्रशासनास माहितीच नाही. परिसरात सुरू असलेल्या काही बांधकाम व्यावसायिकांचे कृत्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनास सर्व काही माहिती असूनही ‘झोपेचे सोंग’ घेत असल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे.थेट रंकाळ्यात खरमाती टाक ूनही कोणीही अटकाव केला नसल्याने संबंधितांचे धाडस आणखी वाढले. पुन्हा दहा ते बारा ट्रक खरमाती रंकाळ्याचा श्वास असलेल्या परताळ्याच्या कडेला आणून टाकली आहे. परताळा हे ‘ग्रीन झोन’ म्हणून महापालिका प्रशासनाने राखीव ठेवला आहे. रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरणाच्या कामी परताळा हे महत्त्वाचे अंग आहे. रंकाळ्याची पाण्याची पातळी तसेच जैववैविधता टिकविण्याचे महत्त्वाचे काम परताळ्यामुळे होते. परताळा परिसर खुला असल्यानेच या परिसरात उभ्या होत असलेल्या काँक्रिटच्या जंगलातही नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, जाणीवपूर्वक परताळा बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परताळा बुजवण्याचे हे कुटिल कारस्थान वेळीच हाणून पाडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जयंती नाल्याशेजारील व नदीपात्रालगत रेडझोन क्षेत्र अशाच प्रकारे बुजविण्यात आल्याचे उदाहरण ताजे आहे. महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत बंदी असलेल्या क्षेत्रात भराव टाकून तो भाग उंच करून त्याजागी बहुमजली इमारतीही उभ्या राहिल्या. आता असाच प्रकार परताळ्याबाबत सुरू असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.रंकाळा व परताळ्यात टाकलेल्या खरमातीची कल्पना महापालिका प्रशासनास तत्काळ दिली आहे. या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी नगरसेविका सुनीता राऊत यांच्या माध्यमातून सभागृहात आवाज उठवणार आहे. - अजित राऊत, माजी नगरसेवक