शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, तर महिला राखीव गटातील एक, असे सात अर्ज अवैध ठरले. महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज होते, त्यात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बाबूराव बनछोडे व रंजना कृष्णात तवटे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

वीरशैव बँकेच्या १९ जागांसाठी ६३ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी छाननी केली. यामध्ये सर्वसाधारण गटातून अमोल पाटील-चंदूरकर, शिवशंकर हत्तरकी, महाबळेश्वर चौगुले, बंडू संकेश्वरे, सोमनाथ पंजे, सुशीला पंजे यांचे अर्ज अवैध ठरल्याने ४९ अर्ज शिल्लक राहिले, तर महिला गटात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बनछोडे व रंजना तवटे यांचे अर्ज शिल्लक राहिले, दोन जागांसाठी दोनच अर्ज असल्याने हा गट बिनविरोध होणार आहे. त्याचबरोबर राखीव गटात चंद्रकांत स्वामी व गुरुदेव चंद्रकांत स्वामी यांचे दोनच अर्ज आहेत, हा गटही बिनविरोध होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत माघारीची मुदत असून, या कालावधीत सर्वसाधारण गट बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.