शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कला, वाणिज्यसाठी पुन्हा रांगा

By admin | Updated: July 10, 2014 00:52 IST

अकरावी प्रवेश आजपासून : विज्ञानचे मेरिटसह अर्ज घटले; १६ पासून कॉलेज सुरू

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अंतिम निवड यादी समितीने आज, बुधवारी आॅनलाईन जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विज्ञान शाखेचे मेरीट (गुणवत्ता) एक टक्क्यांनी घटली आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी यंदा अर्ज वाढले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाखेनुसार प्रवेश दिला आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवला जाणार नाही. उद्या, गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक शरद गोसावी व प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. बी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.गोसावी म्हणाले, शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दि. २७ जूनपासून सुरुवात झाली. समितीकडे १३ हजार २४४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १२ हजार ८०४ विद्यार्थ्यांची निवड यादी बनविली आहे. २० टक्के जागांवर व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयांनी प्रवेश दिले आहेत. निवड यादीसाठी प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या व क्षमता यांचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आरक्षणदेखील लक्षात घेतले आहे. त्यात विज्ञान शाखेसाठी ६७४६, वाणिज्य शाखा (मराठी) २७५८, (इंग्रजी) ११५८, तर कला शाखा (मराठी) २१२०, (इंग्रजी) २२ अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. यावर्षी विज्ञान शाखेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० अर्र्ज कमी, तर वाणिज्यसाठी ६५०, कलासाठी ३८३ अर्ज अधिक आले आहेत. त्यावर तुकड्या न वाढविता सध्याच्या कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढवून दिल्या आहेत. त्यात केवळ वाणिज्य शाखांच्या मराठी माध्यमची तुकडीची प्रवेश क्षमता ८० वरून ११०, तर इंग्रजी माध्यमची १३० वरून १६० इतकी केली आहे. तर, कला, विज्ञानच्या तुकडीत कोणताही बदल केलेला नाही. निवड यादी पाहिली असता गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेचे मेरिट एक टक्क्याने घसरले आहे. डॉ. पाटील म्हणाले, निवड यादीतील विद्यार्थ्यांनी उद्यापासून या कालावधीत कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रांसह त्यांची निवड झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बदल करता येणार नाही. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये दि. १६ जुलैपासून सुरू होतील. (प्रतिनिधी)