शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

राजू शेट्टींचा 'आक्रोश'; ४०० रुपयांच्या मागणीला मिळणार यश 

By भीमगोंड देसाई | Updated: October 26, 2023 16:38 IST

शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य मंडप उभारून जेवणाची व्यवस्था केली

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : मुक्कामाच्या ठिकाणीच चहा, नाश्ता करून सकाळी सात वाजता आक्रोश पदयात्रा निघते. यात्रा पुढे, पुढे जाईल तशी गर्दी वाढत जाते. एका गावातून दुसऱ्या गावात पोहचताच तिथे माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव होतो. धनगरी ढोल वाजवले जातात. फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून औक्षण होते. असे चित्र बुधवारी पन्हाळा तालुक्यातील माेहरे, आरळे, सातवे गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेत पाहायला मिळाले. उसाला तीन हजार रुपयांपर्यंत दर राजू शेट्टी यांच्यामुळेच मिळाला. आता ४०० रुपयेही त्यांच्या लढ्यामुळेच मिळणार म्हणून आम्ही यात्रेत पदरमोड करून सहभागी झालो अशा भावाना मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.शिरोळ येथून सुरू झालेली शेट्टी यांची पदयात्रा नवव्या दिवशी पन्हाळा तालुक्यात पोहोचली. मंगळवारी रात्री वारणा कोडोली येथे मुक्काम करून सकाळी सात वाजता तेथून निघाली. वारणेचा खोरा असूनही गावागावात यात्रेचे जल्लोषात स्वागत होत राहिले. गाव सोडल्यानंतर शेतात काम करणारे शेतकरीही रस्त्यावर येऊन यात्रेचे स्वागत करीत होते. मोहरेत यात्रा आली. ग्रामस्थांनी यात्रेतील शेतकऱ्यांना सरबत, पाण्याच्या बाटल्या दिल्या. सभा झाली. ४०० रुपये घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडायचे नाही, आता मागे हटायचे नाही, असा संदेश सभेत शेट्टी यांनी देताच यात्रेतील आणि सभेतील शेतकऱ्यांत जोम संचारला. तेथून यात्रा मार्गस्थ झाली. थोडे अंतर चालल्यानंतर वाढलेले वय आणि चालून थकवा आल्याने शेट्टी यांच्या पायाची गती मंदावली. रस्त्याच्या कडेला एका झाडाखालीच ते आडवे झाले.आरळे गावातून सातवे येथे दुपारी दीडच्या सुमारास यात्रा पोहोचली. येथे शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भव्य मंडप उभारून जेवणाची व्यवस्था केली. यात्रेतील सर्व शेतकऱ्यांना गावातील तरुण, युवक, शेतकऱ्यांनी दही, खर्डा, भाकरी, भात आग्रहाने जेऊ घातले. शेतकऱ्यांनी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेऊन सावलीला विश्रांती घेतली. शेट्टी यांनीही कार्यकर्त्याची घरी थांबून सुजलेल्या पायाला, फोडांना औषधी लावून घेतली. रक्तदाब, मधुमेहाची गोळी घेतली. थोडा वेळ विश्रांती घेऊन दुपारी चारला पुन्हा सावर्डेच्या दिशेने यात्रा मार्गस्थ झाली. तेथून थेरगावातून शाहूवाडी तालुक्यातील चरण येथे मुक्कामाला पोहोचली.

चालणाऱ्या पायांची पूजामोहरे गावातील रमेश जगदाळे या शेतकऱ्याने पदयात्रेतून शेट्टी यांना आग्रहाने घरी नेले. पाय परातीमध्ये ठेवून त्याची पूजा करून औक्षण केले. यावर भावनिक होऊन शेट्टी असे काही करू नको, असे सांगितले. त्यावेळी रमेश यांनी तुमची नाही तर इतके किलोमीटर चालणाऱ्या पायांची पूजा केली आहे. यात काहीही गैर वाटून घेऊ नका, असे सांगितले.

पदयात्रेमुळे शेतकऱ्यांमध्ये व्यापक जागृती झाली आहे. यामुळे ४०० रुपये कारखानदारांना द्यावेच लागतील. शेट्टी यांच्या लढ्यामुळेच दुसरा हप्ताही मिळणार असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पक्ष, गट तट विसरून शेतकरी यात्रेत सहभागी होत आहेत. - विजय सावंत, शेतकरी, सातवे, ता.पन्हाळा 

यात्रेच्या पहिल्या दिवसापासून आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाईल तशी गर्दी वाढतच आहे. शेतकऱ्यांमध्ये केवळ शेट्टीच उसाला दर मिळवून देतील, असा विश्वास निर्माण झाला आहे. - बाळासाहेब माने, हरोली, ता. शिरोळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी