शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रम’

By admin | Updated: August 5, 2014 00:13 IST

जिल्हा परिषदेचा पुढाकार : अभिलेख अद्ययावत करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : ग्रामपंचायत स्तरावरील अभिलेखे अद्ययावत व सुस्थितीत ठेवण्यासाठी राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ९ आॅगस्ट ते २ आॅक्टोबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीस घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. अनेक महत्त्वाच्या योजना व विकासकामे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केलेली आहेत. यासाठी ग्राम व्यवस्थेमध्ये सुप्रशासनाची गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व प्रशासकीय बाबींसंदर्भातील घरठाणपत्रक, कर आकारणी नोंदवही, किरकोळ वसुली नोंदवही, खर्चाची प्रमाणके, बांधकामासंदर्भातील करारपत्रे, मोजमाप पुस्तके, स्थावर व जंगम मालमत्ता नोंदवही, जन्म, मृत्यू व विवाह नोंदवही, रोजकीर्द आदी महत्त्वाचे अभिलेखे आहेत. त्याचा वापर भविष्यात वारंवार करावा लागतो. अभिलेखांचे वर्गीकरण व स्कॅनिंग केल्यानंतर भविष्यात मागील कागदपत्रे तत्काळ व सुरक्षित उपलब्ध होऊन प्रशासकीय कामकाज करणे अत्यंत सोयीचे होणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुधारणा व सुसूत्रता आणण्यासाठी ९ आॅगस्ट, क्रांतीदिनापासून ‘राजर्षी शाहू ग्रामप्रशासन सुधारणा कार्यक्रम’ हाती घेतला आहे. ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असून चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे मूल्यांकनही केले जाणार आहे.हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी अध्यक्ष असणार आहेत.