शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम वरुटेंवर कारवाई करणार

By admin | Updated: November 20, 2014 00:19 IST

एस. व्ही. पाटील : शिक्षक संघाच्या नावाचा गैरवापर

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असताना राजाराम वरुटे संघाच्या नावाचा गैरवापर करत आहेत. आगामी महामंडळाच्या बैठकीत वरुटे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव करणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (दि. २३) शिक्षक संघाचे राज्यस्तरीय शिक्षक महामंडळ सभेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील म्हणाले, राज्य शासनाने नुकतीच अधिकृत शिक्षक संघटना कोणत्या हे सांगितले आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक शिक्षक संघ हा अधिकृत संघ आहे. शिवाजीराव पाटील यांच्याबाबत न्यायप्रविष्ठ बाब आहे; पण राजाराम वरुटे हे संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यांनी स्वत:हून राजाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिक्षकांच्या जाहीर सभेत नवीन संघटनेची नोंदणी केल्याची घोषणा केली असताना ते पुन्हा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष म्हणून दिशाभूल करत आहेत. त्याला राज्यातील शिक्षक भूलणार नसून संभाजीराव थोरात यांच्यामागे राज्यातील ३३ जिल्हाध्यक्ष, महापालिका व नगरपालिकांचे अध्यक्ष आहेत. शिक्षक संघ कोणाचा, राज्यातील शिक्षक कोणाच्या मागे आहेत, हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी कोल्हापुरात रविवारी (दि. २३) सकाळी दहा वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर येथे महामंडळ घेण्यात आले आहे. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या महामंडळासाठी राज्यातील किमान चार हजार, तर कोल्हापुरातील दोन हजार शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)