शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:13 IST

जिल्ह्यातील ९३ मार्गांवर पाणी : वाहतूक ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरु लागली आहे. आज, केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. यामार्गावरील वाहतूक शिवाजी पूल - केर्ली - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने सुरु आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण, असे ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या, तरी काही काळ ऊनही पडले होते. पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी होईल, अशी अपेक्षा होती; पण धरणातून विसर्ग सुरूच राहिल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले त्यातून प्रतिसेंकद २९२८ घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणातून १५३६९ तर दूधगंगेतून १८६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी स्थिरावली असली, तरी नदीकाठच्या गावांतील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील तीन प्राथमिक, तर एक माध्यमिक शाळा बंद राहिली.

जिल्ह्यात असे झाले स्थलांतर..तालुका -  कुटुंबे - व्यक्ती - जनावरे

  • राधानगरी  - ४७ - २०२ -  १२८
  • करवीर - ४० - ४६ - ०
  • भुदरगड - ०६ - २२ - ०५
  • कागल - ०२ - ११ - ०

असे आहेत मार्ग बंद

  • राज्य - १०
  • प्रमुख जिल्हा मार्ग - ३९
  • इतर जिल्हा मार्ग - १४
  • ग्रामीण मार्ग - ३०

धरणातील विसर्गधरण - विसर्ग (घनफूट) 

  • राधानगरी - ४,३५६
  • वारणा - १५,३६९ 
  • दूधगंगा - १८,६००
  • कासारी - १,५०० 
  • घटप्रभा - ४,२७७ 
  • धामणी - ७,१७५ 

एस. टी. च्या ३४ फेऱ्या बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस. टी. च्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. दिवसभरात एस. टी. च्या ३४ फेऱ्या रद्द झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

पडझडीत ४८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४२ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ४८ लाख १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.