शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कोल्हापुरातील पाचगावात जुगार अड्ड्यावर छापा; ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन माजी नगरसेवकांच्या मुलांसह १३ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:13 IST

छापा पडताच पळापळ

कोल्हापूर : पाचगावच्या हद्दीत गिरगाव रोडवर अण्णा पाटील नगर येथे संजय बाबूराव बोटे (वय ४०) याच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून करवीर पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईत जुगार अड्ड्याच्या मालकासह १० जणांना ताब्यात घेऊन १३ जणांवर गुन्हा दाखल केला. जुगार अड्ड्यावरील सव्वा लाखाची रोकड, मोबाइल, वाहने असा ३३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जुगार खेळणाऱ्यांमध्ये दोन माजी नगरसेवकांच्या मुलांचा समावेश आहे.पाचगाव येथील अण्णा पाटील नगरमध्ये संजय बोटे याच्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १७ ते १८ जण जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांची चाहूल लागताच यातील पाच ते सहा जण पळून गेले. उर्वरित १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वा लाखाची रोकड, आठ मोबाइल, तीन दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि एक रिक्षा असा ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह घरमालक आणि जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत.यांच्यावर गुन्हे दाखलघरमालक संजय बोटे याच्यासह जुगार अड्ड्याचा मालक संतोष गायकवाड (रा. जोशीनगर झोपडपट्टी, संभाजीनगर), योगेश मोहन सूर्यवंशी (३५, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) यांच्यासह खेळणारे अरविंद सखाराम कुचेकर (२९, रा. राजेंद्रनगर), अनिकेत बळवंत कदम (३२), प्रकाश विष्णू बुचडे (३२, दोघे रा. यवलुज, ता. पन्हाळा), उत्तम राजेंद्र भोसले (४२, रा. उद्यमनगर), अतिश गोरोबा कांबळे (वय ३०, रा. जोशीनगर झोपडपट्टी), कुणाल रणजीत परमार (३६, रा. गुजरी, कोल्हापूर), सागर खंडू कांबळे (३०, रा. राजेंद्रनगर), सौरभ अशोक पोवार (२०, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर), अमोल बुकशेट (रा. कसबा बावडा), रवी सोनटक्के (रा. राजेंद्रनगर) यांच्यासह अनोळखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल केला.छापा पडताच पळापळपोलिसांनी छापा टाकताच अमोल बुकशेट, रवी सोनटक्के यांच्यासह इतर तीन ते चारजण पळून गेले. इतरांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. वाहने पोलिसांच्या हाती लागल्याने काही जणांना पळून जाता आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Raid on Kolhapur Gambling Den: ₹33 Lakh Seized, 13 Booked

Web Summary : Police raided a gambling den in Kolhapur's Pachgaon, seizing ₹33 lakh worth of assets. Thirteen individuals, including sons of ex-councilors, were booked. The raid uncovered cash, mobiles, and vehicles at Sanjay Bote's residence. Further investigation is underway.