शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवले, नंतर कारागृहात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कळंबा कारागृहाबाहेर बाकड्यावर सीमकार्ड ठेवले अन‌् नंतर कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड गुपचूप घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत ...

कोल्हापूर : कळंबा कारागृहाबाहेर बाकड्यावर सीमकार्ड ठेवले अन‌् नंतर कारागृहात जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड गुपचूप घेऊन कैद्यांपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, कारागृहाच्या भिंतीवरून दहा मोबाईल व गांजा आत फेकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली. ओंकार ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (वय २२, रा. साईनगर, शहापूर, इचलकरंजी), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. २२ डिसेंबरला मध्यरात्री भीष्म्या ऊर्फ भीम्या सुभेदार चव्हाण (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), राजेंद्र धुमाळ, ऋषिकेश सदाशिव पाटील (२५, रा. कोदवडे, ता. राधानगरी, सध्या रा. गंगावेश), जयपाल किसन वाघमोडे (रा. वडिये, ता. कडेगाव, जि. सांगली, सध्या रा. गंगावेश) यांनी कळंबा कारागृहाच्या भिंतीवरुन आत मोबाईल फेकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पैलवान ऋषिकेश व शुभम सोपान ऐवळे (वय २३, रा. शहापूर, इचलकरंजी) याला यापूर्वीच अटक केली आहे.

दरम्यान, गुरुवारी राजेंद्र धुमाळ व ओंकार गेंजगे यांना अटक केली. गेंजगे हा विटा (सांगली) येथील एका खूनप्रकरणी कारागृहात न्यायालयीन कैदी होता. काही महिन्यांपूर्वी गेंजगे याच्या सहकाऱ्याने सीमकार्ड कारागृहाबाहेर बाकावर ठेवले. आत जाणाऱ्या व्यक्तीने तेच सीमकार्ड कारागृहात गेंजगेपर्यत पोहोचवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हेच सीमकार्ड शुभम ऐवळे याच्या नावे असल्याचे तसेच ते कारागृहात गेंजगे व खंडेलवाल यांनी वापरले. त्यामुळे याप्रकरणी कारागृहातील काही कर्मचारी सहभागी असल्याचेही दिसते. अटकेतील गेंजगे व शुभम ऐवळे हे दोघे नातेवाईक आहेत. भिंतीवरून कारागृहात राजेंद्र धुमाळ यानेच आत मोबाईलचे गाठोडे टाकल्याचे चौकशीत उघडकीस आले.

कारागृहातून खंडेलवालनेच फोनवरुन १० मोबाईल मागवले

सापडलेल्या सीमकार्डचा गेंजगे व खंडेलवाल यांनी किमान तीन महिने कारागृहातून बाहेर कॉलसाठी वापर केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. कारागृहातील संशयित विकास खंडेलवाल याने कारागृहातून याच सीमकार्डवरुन भीष्म्या चव्हाण याला फोन करून दहा मोबाईल पाठविण्याचा निरोप दिल्याचेही दिसून आले.

भीष्म्या चव्हाण अटकेनंतर उलगडा

अद्याप पोलिसांना गुंगारा देणारा भीष्म्या चव्हाण याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

फोटो नं. १४०१२०२१-कोल-राजेंद्र धुमाळ (जेल-आरोपी)

फोटो नं. १४०१२०२१-कोल-ओंकार गेंजगे (जेल-आरोपी)