पुनवेचा चांद - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST2021-09-24T04:26:35+5:302021-09-24T04:26:35+5:30

सुदैवानं उंचावर घर असल्यानं घरातल्या सामानाची नासधूस झाली नाही. तीन दिवसांनंतर मावशी रमाला आणि तिच्या नवजात लेकीला घेऊन घरी ...

Punvecha Chand - Part 2 | पुनवेचा चांद - भाग २

पुनवेचा चांद - भाग २

सुदैवानं उंचावर घर असल्यानं घरातल्या सामानाची नासधूस झाली नाही. तीन दिवसांनंतर मावशी रमाला आणि तिच्या नवजात लेकीला घेऊन घरी आली. मावशी म्हणाली, ‘रमा म्या पंधरा दिस तुझ्याजवळ राहते. काळजी करू नको. माझ्या नातीचं बारसं करूनच जाते.’ रमानं मावशीला मिठी मारली ‘तू माझी माय झालीस मावशे... महा आदार दिलास... तुझ्या रूपानं देवंच हाय आमच्या संगं.. लेकीचं नाव तूच ठिवायचं तुजा हक्क हाय त्यो. ’

बाराव्या दिवशी शेजारच्या आयाबायांना बोलावून बारसं झालं. शांतारामनं नवीन दोरीचा पाळणा आणला होता. शेजारणीनं फुलांच्या माळा पाळण्याला बांधल्या होत्या. शांतारामनं नवीन झबलं, टोपडं, कुंची, लहानशी गादी, उशी लेकीसाठी आणली होती. अर्धा किलो बर्फीनं साऱ्यांची तोंडं गोड झाली. येसूमावशीनं नातीचं नाव ठेवलं... ‘पूनम’ म्हणाली.

नारळी पूनवंच्या रातीला पोरीचा जन्म झालाया म्हणून म्या हिचं नाव ठेवतेय ‘पूनम’.. पुनवेच्या चांदागत माझी नात मोठी व्हईल.

पूनम ... पूनम .... आयाबायांनी साद घातली. रमा आणि शांतारामच्या आनंदाला पारावर उरला नाही.

Web Title: Punvecha Chand - Part 2