शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

महापुरात पाठ फिरविणाऱ्या सरकारला खाली खेचा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:47 AM

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई ...

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली, बोटीतून पिकनिकला आल्यासारखे सेल्फी काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले, अशा असंवेदनशील आणि मस्तवाल सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कोल्हापुरात केले. महाजनादेश यात्रा घेऊन कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री महापूरकाळात कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.वंचित आघाडीच्या नागपूरपासून सुरू झालेल्या सत्तासंपादन यात्रेचा समारोप बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात दसरा चौकात झाला. निर्धार सभेत भर पावसात भिजतच आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फुटला. स्वबळावर जागा निवडून आणण्यासाठी २८८ किलोंचा हार अर्पण केला गेला.आंबेडकर म्हणाले, संकटकाळात मदतीची सरकारची जबाबदारी होती; पण तीदेखील त्यांनी नीट पार पाडली नाही. पूरग्रस्तांना आपुलकी दाखवली नाही. धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन केले नाही.व्यासपीठावर अण्णाराव पाटील, नवनाथ पडळकर, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, प्रा.यशपाल ंिभंगे, अरुणा माळी, इंद्रजित कांबळे, जीवन पाटील, यशवंत भिगे, अनिल म्हमाने, अस्लम सय्यद आदी मान्यवर नेते उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी स्वागत केलेजीवन पाटील वंचितमध्येराष्ट्रवादीचे आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. पावसातच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसूनच पाटील यांचे जल्लोषात सभास्थळी आगमन झाले. त्यांचे निळा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.सध्याचे भाजपचे सरकार आजवरचे सर्वांत मोठे चोर आहे. विरोधी पक्ष लंगडा झाला आहे, स्वत:च्या पायावर उभे राहायचे म्हटले तर त्यांना तुरुंगाची भीती दाखविली जात आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सगळा मामला सुरू आहे. सरकारच्या सर्वच कामांत भ्रष्टाचार वाढला आहे. बेरोजगारी वाढली, कामगारांच्या हातांना काम राहिले नाही, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे सरकार शेतकरी गोरगरिबांचे नसून दलाल आणि भांडवलदारांचे आहे, असाघणाघाती आरोप आंबेडकर यांनी केला.