शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पुईखडी एअर व्हॉल्व्ह गळतीने लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

कळंबा : पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातून उपनगरास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह मंगळवारी रात्री खराब होऊन रात्रभर लाखो लिटर ...

कळंबा : पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातून उपनगरास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह मंगळवारी रात्री खराब होऊन रात्रभर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. संबंधित गळतीची माहिती प्रशासनास माजी नगरसेविका मनीषा कुंभार यांनी वेळेत देऊनही दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा वितरण विभागाच्या प्रशासनास गुरुवारी सकाळी मुहूर्त मिळाला. गुरुवारी सकाळी दुरुस्ती करून पुन्हा चाचणी घेण्यात येऊन गळती बंद करण्यात प्रशासनास यश मिळाले.

उंचावरून सखल भागात पाणी वाहून नेणाऱ्या मुख्य जलवहिनीत बऱ्याचदा हवा साठून राहते. त्यामुळे व्हॉल्व्ह खराब होतात. ज्यामुळे मुख्य जलवाहिनी खराब होण्याची शक्यता असते. उपनगरात विविध मुख्य जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या एअर व्हॉल्व्हची दर तीन महिन्यांत देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

मुळात पाणीपुरवठा वितरण विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने ही कामे परिणामकारकरीत्या होत नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे कारंजे अनुभवण्यास मिळत आहेत. एअर व्हॉल्व्ह देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराचे असते. त्याचेही याप्रश्नी दुर्लक्ष झाल्याने अनेक ठिकाणी एअर व्हॉल्व्ह खराब झाले आहेत .

पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातून उपनगरात जाणाऱ्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह खराब होऊन दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी दुरुस्ती करण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे नागरिकांनी अनुभवले.

फोटो : २२ कळंबा पुईखडी पाणीपुरवठा

पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातून जाणाऱ्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह मंगळवारी रात्री खराब होऊन पाण्याचे कारंजे उडत होते. गुरुवारी सकाळी त्याची प्रशासनाने दुरुस्ती केली.