राधानगरी कोविड सेंटरला बेड, गाद्या, वैद्यकीय साहित्य प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST2021-05-31T04:17:57+5:302021-05-31T04:17:57+5:30

राशिवडे : राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालय व तंत्रशिक्षण महाविद्यालय येथील कोविड सेंटरला वीस बेड, गाद्या, इतर वैद्यकीय साहित्य कै. ...

Provision of beds, mattresses, medical supplies to Radhanagari Kovid Center | राधानगरी कोविड सेंटरला बेड, गाद्या, वैद्यकीय साहित्य प्रदान

राधानगरी कोविड सेंटरला बेड, गाद्या, वैद्यकीय साहित्य प्रदान

राशिवडे : राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालय व तंत्रशिक्षण महाविद्यालय येथील कोविड सेंटरला वीस बेड, गाद्या, इतर वैद्यकीय साहित्य कै. सावित्री दाजी धुंदरे यांचे स्मरणार्थ धुंदरे परिवारातर्फे देण्यात आले. उत्तरकार्याला आंब्याची रोपे वाटप करण्यात आली.

सावित्री दाजी धुंदरे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. उत्तरकार्याला फाटा देत गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे यांच्या परिवाराने राधानगरी कोविड सेंटरला साहित्य वाटप करून सामाजिक संदेश दिला.

राधानगरी येथे सुसज्ज १२५ खाटांचे कोविड सेंटर सुरू असून त्यातील ३५ ऑक्सिजन बेड आहेत. रुग्णवाढीचा वेग पाहता येथे आणखी बेडची आवश्यकता असल्याचे तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजीचे उत्तरकार्याच्या खर्चास बगल देऊन माजी सरपंच सागर धुंदरे यांनी वीस खाटांचे साहित्य या कोविड सेंटरला प्रदान केले. तहसीलदार निंबाळकर यांच्या देखरेखीखाली व डॉ. गवळी, डॉ.राजेंद्र शेटे, डॉ. दिग्विजय पाटील व डॉ. मयूर पाटील, त्यांचे स्टाफ नर्स यांच्यामार्फत चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. दानशूर व्यक्तींनी वैद्यकीय साहित्य सेंटरला द्यावे, असे अवाहन माजी सरपंच सागर धुंदरे यांनी या वेळी केले.

३० राधानगरी कोविड सेंटर हेल्प

फोटो ओळी

राधानगरी येथील कोविड सेंटरला खाट, गाद्या, वैद्यकीय साहित्य तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आले.

Web Title: Provision of beds, mattresses, medical supplies to Radhanagari Kovid Center