रुग्णासाठी बेड विचारताना ही माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:17+5:302021-04-30T04:29:17+5:30

कोल्हापूर : सध्या महापालिका, सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी बेड शिल्लक ...

Provide this information when asking for a bed for the patient | रुग्णासाठी बेड विचारताना ही माहिती द्या

रुग्णासाठी बेड विचारताना ही माहिती द्या

कोल्हापूर : सध्या महापालिका, सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी बेड शिल्लक आहे का म्हणून फोन केला जातो. मात्र, रुग्णाची सविस्तर माहिती नसल्यामुळे अनेकवेळा डॉक्टर आणि नातेवाईक यांचाही वेळ वाया जात असल्याचे चित्र आहे.

जी व्यक्ती रुग्णासाठी फोन करत असते, त्या व्यक्तीला रुग्णाबाबतची कोणतीच आवश्यक माहिती नसते. त्यामुळे फोन घेणाऱ्यांचीही बेड देण्यासाठीचा निर्णय घेताना अडचण होते. त्यामुळे यासाठी रुग्णाची खालील माहिती घेऊनच बेडसाठी फोन करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. ही माहिती घेऊन फोन केल्यास बेडसाठी नियोजन करणाऱ्यांना सोपे जाते. अन्यथा संबंधित फोन करणारी व्यक्ती रुग्णाचे नाव, ऑक्सिजन पातळी, कसला बेड हवा आहे अशी माहिती दुसऱ्या नातेवाइकांना विचारून सांगत असते आणि त्यामध्ये सर्वांचाच वेळ जाते. त्यामुळे खालील माहिती घेऊन फोन करणे सर्वांच्याच साेयीचे होणार आहे.

चौकट

रुग्णाचे पूर्ण नाव

वय

कोणत्या बेडची गरज आहे....ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर

रुग्णाची ऑक्सिजन पातळी

सीटीस्कॅन स्कोअर आणि कधी तपासणी केली ती तारीख

सध्या काय त्रास होतो

आधीपासून कोणते आजार आहेत.. उदा रक्तदाब, मधुमेह

संपर्कासाठी नातेवाइकाचा मोबाईल नंबर

Web Title: Provide this information when asking for a bed for the patient