शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार थांबला, जोडण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या ...

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ७२० सदस्य बिनविरोध निवडून आले असून, ७ हजार ६५७ जण रिंगणात आहेत.

सरपंचपदाच्या आरक्षणाशिवाय लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदाचे गृहीत धरूनच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराने वेग घेतला; पण ४ जानेवारीला माघारीनंतर खऱ्या अर्थाने धुरळा उडाला होता. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी पॅटर्नसह स्वत:चाही सोईच्या आघाडीचा पॅटर्न राबवत निवडणूक प्रचंड ईर्षेने लढविली जात आहे. स्थानिक पातळीवरील गट-तट आणि त्याला कौटुंबिक संघर्ष व भाऊबंदकी यांचीही फोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने गावच्या राजकारणाने टोक गाठले आहे. काेणत्याही बड्या नेत्यांच्या प्रचारसभांशिवाय केवळ वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, एवढ्यावरच प्रचार सिमित राहिला. बड्या नेत्यांची भूमिका पॅनेल निवड आणि आर्थिक रसदीपुरती सिमित राहिली.

चौकट ०१

तरुण निर्णायक, महिला नावालाच

यंदाच्या या निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आव्हान निर्माण केले आहे. बऱ्याच गावांमध्ये तरुणांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे, तर काही ठिकाणी बिनविरोधमध्ये जागा वाढवून घेतल्या आहेत. गावच्या आखाड्यात तरुण निर्णायक भूमिकेत आले आहेत. महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने महिलांनीही प्रचारात कंबर कसली होती. जाहीर प्रचाराबरोबरच हळदी-कूंक कार्यक्रमाद्वारे त्यांनी घर टू घर प्रचारावर भर दिला.

चौकट ०२

तीळगूळ घ्या, मत द्या

मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी संक्रांतीचेनिमित्त साधून घरोघरी वाण म्हणून भेटवस्तू पाठविण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा राबताना दिसत आहे. आज, गुरुवारी संक्रांतीचा योग साधून तीळगुळाच्या निमित्ताने आजही घरोघरी मतांची देवाणघेवाण होणार आहे.