चुयेकरांना अभिवादन करत ‘सत्ताधारी’ आघाडीचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:44+5:302021-04-22T04:23:44+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचा प्रचार प्रारंभ बुधवारी संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात ...

Promoting the 'ruling' front by greeting Chuekar | चुयेकरांना अभिवादन करत ‘सत्ताधारी’ आघाडीचा प्रचार

चुयेकरांना अभिवादन करत ‘सत्ताधारी’ आघाडीचा प्रचार

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचा प्रचार प्रारंभ बुधवारी संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली आघाडी रिंगणात उतरली आहे.

सत्ताधारी आघाडीतील उमेदवारांची घोषणा मंगळवारी करण्यात आल्यानंतर बुधवारी सर्व उमेदवारांनी ‘गोकुळ’ शिरगाव दूध प्रकल्प येथील आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अरुण नरके म्हणाले, निवडणुकीला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जायचे आहे. विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पुन्हा एकदा ‘गोकुळ’वर झेंडा फडकवूया.

यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, सत्यजित पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, सदानंद हत्तरकी, चेतन नरके, धनाजीराव देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, राजाराम भाटळे, रवीश पाटील, रणजित पाटील, शौमिका महाडिक उपस्थित होते.

फोटो ओळी :

‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजर्षी शाहू आघाडीने ‘गोकुळ’ दूध प्रकल्प येथील आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ केला.

(फोटो-२१०४२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Promoting the 'ruling' front by greeting Chuekar