मुरगुडच्या प्राध्यापकाची जागतिक स्तरावर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST2021-05-30T04:21:34+5:302021-05-30T04:21:34+5:30

मुरगूड : जागतिक स्तरावर सुमारे १६७ देशांतील सुमारे दहा हजार विद्यापीठातील तब्बल पाच लाख प्राध्यापकांच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर ...

Professor of Murgud globally recorded | मुरगुडच्या प्राध्यापकाची जागतिक स्तरावर नोंद

मुरगुडच्या प्राध्यापकाची जागतिक स्तरावर नोंद

मुरगूड : जागतिक स्तरावर सुमारे १६७ देशांतील सुमारे दहा हजार विद्यापीठातील तब्बल पाच लाख प्राध्यापकांच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर मुरगूड ता. कागल येथील व कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये सेवेत असणाऱ्या प्रा. अशोक दत्तात्रय चौगले यांनी स्थान मिळवले आहे. ते मधुमेह यावर संशोधन करत आहेत.

जागतिक स्तरावर दरवर्षी विविध नामांकित संस्थांमार्फत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मानांकन ठरविले जाते. २०२१ या वर्षासाठी नुकतेच ए. डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे जागतिक स्तरावरील १६७ देशांमधील दहा हजारांवर विद्यापीठातील साधारण पाच लाख शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध केली. ही यादी तयार करण्यासाठी गेल्या पाच वर्षांतील शास्त्रज्ञांचे संशोधन पेपर, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स आदी निकष वापरले. या नामांकित शास्त्रज्ञांचा यादीमध्ये न्यू कॉलेजमधील डॉ. अशोक चौगले यांनी मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस बायोकेमिस्ट्री या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञामध्ये स्थान मिळविले आहे.

डॉ. अशोक चौगले हे मूळचे मुरगूडचे रहिवाशी आहेत. दलित मित्र व थोर विचारवंत डी. डी. चौगले यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे एमएस्सी आणि पीएचडी शिवाजी विद्यापीठात जीवरसायनशास्त्र या विषयात झाले आहे. त्यांनी पोस्ट डॉक्टरलचे काम हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पूर्ण केले आहे. त्यानंतर ते न्यू कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे संशोधन मुख्यत्वे डायबेटिस या क्षेत्रात चालू आहे.संस्थेचे पाठबळ आणि प्राचार्यांचा मोलाच्या सहकार्यामुळे संशोधन कॉलेजमध्येच चालू ठेवले. आज त्यांनी महाविद्यालयाचे नाव जागतिक स्तरावर प्रसिद्धीस आणले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Professor of Murgud globally recorded