शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

धान्य साठवणुकीसाठी कडुलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती -: निसर्गमित्रचे अनोखे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 8:58 PM

कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.

कोल्हापूर : येथील निसर्गमित्र परिवारामार्फत पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच कृतिशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याहीवेळी संस्थेच्या प्रोत्साहनामुळे धान्य साठवणुकीसाठी कडूलिंबाच्या गोळ्या आणि घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी रद्दी आणि जुन्या साड्यांचा उपयोग करून रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध झाली आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला गृहिणींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

निसर्गमित्र परिवारामार्फत गुढीपाडव्याला वापरून झालेल्या कडूलिंबाच्या पानापासून साठवणुकीच्या धान्यात किटकनाशक म्हणून वापरावयाच्या गोळ्या तयार केल्या आहेत. कोणत्याही कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर न करता कडूलिंबामध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या किटकनाशक गुणांचा वापर करून या गोळ्यांची निर्मिती संस्थेने केली आहे.संस्थेने मंगेशकर नगर, बेलबाग, रविवार पेठ, मंडलिक वसाहत, सरनाईक वसाहत आणि महालक्ष्मीनगर परिसरातील सुमारे ६५0 परिवारांकडे या गोळ्या सुपूर्द करून या गोळ्यांची चाचणी घेतली. या गोळ्या परिणामकारकरीत्या काम करत असल्याचा अभिप्राय या परिवाराने दिला. कडूलिंबाच्या गोळ्यांची निर्मिती संस्थेचे सदस्य आणि बीवेल फॉर्मास्युटिकल कंपनीचे विलास डोर्ले यांच्यामुळे शक्य झाली. या उपक्रमाचे संयोजन पराग केमकर, अनिल चौगुले, अभय कोटणीस, विश्वास चौगुले, सुनील चौगुले, यश चौगुले, प्रफुल्ल खेडकर, अस्मिता चौगुले यांनी केले.रद्दीपासून कागदी पिशव्या, कापडी पिशव्यांची निर्मितीसंस्थेने घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. घरोघरी जुनी वापरलेली साडी आणि एक किलो रद्दी पेपर संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामधून १00 हून अधिक जुन्या साड्या आणि अंदाजे २५0 किलो रद्दी संस्थेकडे जमा झाली. या साड्यांपासून प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आणि कोरड्या पदार्थांसाठी रद्दीतून कागदी पिशव्या तयार करण्याचे संस्थेचे नियोजन आहे.

महिला बचत गटांना रोजगाराची संधीटाकाऊ वस्तूंचा वापर करून कापडी आणि कागदी पिशव्या निर्मितीद्वारे महिला मंडळ, महिला बचत गट यांच्याकरिता कायमस्वरूपी रोजगाराची उत्तम संधी यानिमित्ताने निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforestजंगल