शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

करवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 7:06 PM

Kolhapur Flood : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले.

ठळक मुद्देकरवीर तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही वेगानेपूरग्रस्तांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत : शीतल मुळे-भामरे

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांनी शनिवारी केले.

पुरामुळे बाधित झालेल्या करवीर तालुक्यातील छोटे गॅरेज, उद्योग व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक, इतर पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पथकांकडून केले जात आहेत.

या पथकाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास पंचनामे वेळेत पूर्ण होऊन शासनाकडून दिली जाणारी मदत व अनुदान लवकरात लवकर मिळेल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ही कागदपत्रे तयार ठेवा- रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, घरठाण पत्रक, ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड.पंचनाम्यासाठी येथे संपर्क साधा१ ) सानुग्रह, निर्वाह भत्त्याचे अनुदान, घराची, गोठ्याची पडझड, व्यावसायिक - शहर : कोल्हापूर मनपा, करवीर : कसबा बावडा, जाधववाडी : उचगाव तलाठी कार्यालय.ग्रामीण भागात : गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, घर/ गोठा पडझडीसाठी बांधकाम विभाग पंचायत समिती करवीर,२) कृषी- शहर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व तलाठी कार्यालय.ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर तसेच संबंधित गावचे कृषी सहायक कार्यालय व तलाठी कार्यालय३) पशुधन- शहरी भाग व ग्रामीण भाग : पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती करवीर, गावचे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार