कोल्हापुरात सबजेलच्या भिंतीवरुन उडी टाकून कैदी पसार, पोलिसांकडून शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:54 AM2023-10-28T11:54:34+5:302023-10-28T11:55:06+5:30

कोल्हापूर : चोरीच्या आरोपातील बिहार राज्यातील कैदी शुक्रवारी येथील बिंदू चौकातील सबजेलच्या भिंतीवर चढून पसार झाला. धनराज कुमार ( ...

prisoners escaped by jumping over the sub jail wall In Kolhapur, police hunted | कोल्हापुरात सबजेलच्या भिंतीवरुन उडी टाकून कैदी पसार, पोलिसांकडून शोधाशोध

कोल्हापुरात सबजेलच्या भिंतीवरुन उडी टाकून कैदी पसार, पोलिसांकडून शोधाशोध

कोल्हापूर : चोरीच्या आरोपातील बिहार राज्यातील कैदी शुक्रवारी येथील बिंदू चौकातील सबजेलच्या भिंतीवर चढून पसार झाला. धनराज कुमार ( रा. बैजू मांझी, बेला सारंग, बिहार ) असे त्याचे नाव आहे. हा आरोपी घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सराईत आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस चौकीत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, धनराजने २३ ऑक्टोबरला मोबाइल चोरी प्रकरणात अडकला. त्याला सबजेलमध्ये बंदिस्त केले होते. नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता सर्व कैद्यांना बरॅकमधून आंघोळ, नाष्ट्यासाठी बाहेर काढले होते. त्यावेळी धनराज याने तेथील बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून जेलमधील पूर्व बाजूस असलेल्या भिंतीवर चढून धूम ठोकली.

तातडीने पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शहर, जिल्ह्यात नाकेबंदी केली. मात्र रात्रीपर्यंत तो पोलिसांना मिळाला नाही. जेल कर्मचारी सुनील चावरे यांच्या फिर्यादीवरून यांची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.

Web Title: prisoners escaped by jumping over the sub jail wall In Kolhapur, police hunted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.