कैद्याचा दोन पोलिसांवर हल्ला, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:51 IST2026-02-13T11:50:25+5:302026-02-13T11:51:41+5:30

कैद्यावर गुन्हा दाखल

Prisoner attacks two policemen in Kalamba Central Jail Kolhapur | कैद्याचा दोन पोलिसांवर हल्ला, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील घटना

कैद्याचा दोन पोलिसांवर हल्ला, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील घटना

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयातील सुनावणीसाठी व्हीसीद्वारे हजर करताना विलंब होत असल्याच्या रागातून कैदी इम्रान शरफुद्दीन शेख (वय ३९) याने ड्युटीवरील दोन पोलिसांना मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. त्यात पोलिस शिपाई संभाजी बाबूराव कामले (२४) आणि विलास उत्तम पारसे हे दोघे जखमी झाले. कामले यांच्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी कैदी शेख याच्यावर गुन्हा दाखल केला.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदी इम्रान शेख हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुरुवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी त्याला कारागृहात व्हीसीद्वारे ऑनलाईन हजर केले जाणार होते. त्याच्या आधी अन्य कैद्यांची सुनावणी होणार असल्याने ड्युटीवरील पोलिस शिपाई कामले यांनी त्याला कोर्ट जाळीमध्ये थांबण्यास सांगितले. 

त्याचा राग आल्यामुळे कैद्याने शिवीगाळ करत कामले यांच्या शर्टची कॉलर पकडून मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी आलेले दुसरे पोलिस शिपाई विलास पारसे यांच्या पायाच्या पिंडरीला चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन कारागृहातील स्वतंत्र कक्षात पाठविले. शासकीय कामात अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे.

Web Title : कोल्हापुर जेल में कैदी ने दो पुलिसकर्मियों पर हमला किया

Web Summary : कोल्हापुर की कलम्बा सेंट्रल जेल में कैदी इमरान शेख ने वीडियो कॉन्फ्रेंस कोर्ट सुनवाई में देरी के कारण दो पुलिस अधिकारियों पर हमला किया। कांस्टेबल कांबले और पारसे घायल हो गए। पुलिस ने शेख के खिलाफ हमला और ड्यूटी में बाधा डालने का मामला दर्ज किया है।

Web Title : Prisoner Attacks Two Police Officers in Kolhapur Jail

Web Summary : An inmate at Kolhapur's Kalamba Central Jail, Imran Sheikh, assaulted two police officers due to a delay in his video conference court hearing. Constable Kamble and Parse were injured. Police have filed a case against Sheikh for assault and obstruction of duty.