शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पॅनेल करण्यासाठी मुश्रीफांवर दबाव

By admin | Updated: April 5, 2015 00:53 IST

‘गोकुळ’ची निवडणूक : सोमवारी भेटीनंतर पुढील दिशा ठरवू ; कार्यकर्त्यांना आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आपण आमदार महादेवराव महाडिक यांना मदत न करता सत्तारूढ आघाडीच्या विरोधात ताकदीने पॅनेल उभा करावे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धरला. शुक्रवारी सायंकाळी कागलमधील अलका शेती फार्मवर मुश्रीफ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भूमिका ठरविण्यासाठी बैठक झाली. मी आमदार महाडिक यांना सोमवारी (दि. ६) व मंगळवारी लगेच माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार विनय कोरे यांंना भेटणार आहे. महाडिक काय सांगतात त्यावर पुढील दिशा ठरवू, असे मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसला मदत करून जिल्हा बँकेत त्या पक्षाची मदत घेण्याचा मुश्रीफ यांचा प्रयत्न आहे; परंतु गोकुळमध्ये सत्तारूढ गटाला पाठिंबा देताना रणजित पाटील यांना सहकार्य व संजय घाटगे यांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी नको, अशी त्यांची अट आहे. रणजित पाटील यांना उमेदवारी मिळण्यात कोणतीच अडचण नाही. ती त्यांच्या स्वत:च्या राजकीय ताकदीवरही मिळते. अडचण अशी आहे की, घाटगे यांना पॅनेलमधून वगळण्याचा निर्णय महाडिक घेऊ शकत नाहीत; कारण त्यास सत्तारूढ गटाचे दुसरे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांचा विरोध आहे. दुसरे असे की, महापालिकेच्या राजकारणातही महाडिक गटाने महापौरांची पाठराखण केल्याने त्यांचा राजीनामा अजून झालेला नाही. आमच्या नेत्यांच्या शब्दाला महाडिक किंमत देत नसतील तर त्यांच्या पाठीमागून आपण तरी का जावे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेच जिल्हा बँकेत काय व्हायचे ते होऊ दे, परंतु गोकुळमध्ये सत्तारूढ गटाच्या विरोधात तुम्ही पॅनेल करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या भावनांची मी नक्की दखल घेईन. गेल्या आठवड्यातही महाडिक यांची भेट घेऊन जे काही सांगायचे ते सांगितले आहे. त्याचे त्यांनी काय केले हे सोमवारी त्यांना भेटल्यानंतर समजेल. त्यानंतर मंगळवारी सतेज पाटील व विनय कोरे यांना भेटून पुढील वाटचालीची दिशा निश्चित करूया, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. कोण कुणाबरोबर...! मुश्रीफ यांच्यावर सत्तारूढ आघाडीस पाठिंबा देऊ नका, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाच तोपर्यंत शनिवारी झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही महाडिक योग्य प्रतिनिधित्व देणार नसतील, तर सतेज पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. त्यासंदर्भात आजच काही कार्यकर्त्यांनी जाऊन सतेज पाटील यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे यातील कोण महाडिक यांच्याबरोबर व कोण सतेज पाटील यांच्याबरोबर राहणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.