शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच!

By admin | Updated: March 10, 2017 23:02 IST

संजयकाका पाटील : बाबर, रयत आघाडीशी चर्चा

सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व रयत विकास आघाडीशी आमची चर्चा सुरू असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल लागताच आपण आमदार अनिल बाबर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यांना एकत्रित बसून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली आहे. ते वेगळा विचार करतील, असे वाटत नाही. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही आ. बाबर यांच्याशी चर्चा केली आहे. रयत विकास आघाडी आमच्यासोबतच राहील. त्यात कसलीही अडचण दिसून येत नाही. त्यांच्याशीही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पंचायत समित्यांसाठीही जोरदार प्रयत्नपंचायत समिती सभापती निवडीनंतर अध्यक्ष निवडीविषयी रयत विकास आघाडी व आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा होईल. जत व मिरज पंचायत समितीमध्येही भाजपचाच सभापती होईल. जतमध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत. जनसुराज्य शक्ती व वसंतदादा आघाडीशी आमदार विलासराव जगताप चर्चा करीत आहेत. मिरजेत भाजपचे ११ सदस्य आहेत. तिथेही शंभर टक्के भाजपचीच सत्ता येईल. याशिवाय काठावर असलेल्या पंचायत समितीतही भाजपच सत्तेत येईल, असेही पाटील यांनी सांगितले.