शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे स्मारक आराखडा सादर

By admin | Updated: January 18, 2017 01:04 IST

महापालिका प्रशासन : तांत्रिक मंजुरीनंतर १५ दिवसांत कामास सुरुवात शक्य

कोल्हापूर : डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या प्रतिभानगर येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा सुधारित आराखडा मंगळवारी महानगरपालिकेस सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत आराखड्याची तांत्रिक छाननी करून १५ दिवसांत मंजुरी देण्यात येईल, असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. नवीन आराखड्यामुळे स्मारकाची जागा दुपटीने वाढणार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे, स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी आराखड्यात काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नवीन आराखडा तयार करावा, त्यासाठी २० लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन रामाणे यांनी दिले होते. त्यानुसार आर्किटेक्ट सावंत यांनी हा सुधारित आराखडा तयार केला. या आराखड्यात आता नव्याने ग्रंथालयाची इमारत, खुले व्यासपीठ, बैठक व्यवस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीचा आराखडा ३५ बाय ३० स्क्वेअर फुटांच्या जागेत तयार करण्यात आला होता, तो आता ७० बाय ६० स्क्वेअर फुटांच्या जागेत करण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाची जागा दुप्पट होईल. या स्मारकामध्ये संदेश देणारे तीन फलक लावले जाणार आहेत. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हे स्मारक करण्याचा सावंत यांचा मनोदय आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती सोयीची होईल, असा त्यांचा दावा आहे.महानगरपालिकेत मंगळवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट सावंत यांनी स्मारकाचे सादरीकरण केले. यावेळी नामदेव गावडे, गिरीश फोंडे उपस्थित होते. महापालिका प्रशासनाकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर १५ दिवसांत स्मारकाचे काम सुरू होईल. साधारणपणे कामाला सुरुवात झाल्यापासून ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे सावंत यांनी सांगितले. जितक्या लवकर तांत्रिक मंजुरी दिली जाईल, तितक्या लवकर कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महावितरणचा अडथळा पानसरे यांच्या स्मारकाच्या आडवे येणारा ‘महावितरण’चा ट्रान्स्फॉर्मर स्थलांतरित करून दुसऱ्या जागी उभारण्यात यावा, अशी विनंती करणारी दोन पत्रे महानगरपालिकेने महावितरण कंपनीला पाठविली आहेत. त्यांना पर्यायी जागाही दिली आहे; परंतु महावितरण कंपनीने या सूचनेकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.ज्यांनी उभी हयात तळागाळातील लोकांच्या कल्याणाकरिता घालविली, अशा पानसरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणीही अडथळा आणू नये, अशी अपेक्षा असताना ‘महावितरण’ मात्र चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.