शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचची फाईल उद्या सादर करणार

By admin | Updated: August 30, 2015 01:08 IST

कृती समिती निमंत्रक राजेंद्र चव्हाण यांची माहिती

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्णांसाठी कोल्हापूर येथे स्थापन करावे, या खंडपीठ कृती समितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सहा जिल्ह्णांचे ठराव व संस्थानकाळातील कोल्हापुरातील खंडपीठाची माहिती मागविली होती. त्यानुसार ही माहिती एकत्र करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फाईल बनविण्यात आली आहे. ही माहितीची फाईल उद्या, सोमवारी मुख्य न्यायाधीश शहा यांची मुंबई प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केली जाणार आहे, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. २१) गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या इमारतीमध्ये कृती समितीबरोबर मुख्य न्यायाधीश शहा यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी कोल्हापूर कार्यक्षेत्रातील प्रलंबित खटले, प्रस्तावित सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्णांचे कोल्हापूरपासून अंतर किती आहे, पक्षकारांना कोल्हापुरात येण्यासाठी कशा पद्धतीची सोय आहे, याची माहिती घेतली. तसेच कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीच्या सहा जिल्ह्णांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. त्यानुसार कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. चव्हाण, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, विजय ताटे, धनश्री चव्हाण, आदींनी ही माहिती संग्रहित करून फाईल तयार केली आहे. काही तज्ज्ञ वकिलांकडून या संदर्भात मार्गदर्शनही घेण्यात आले आहे. ही फाईल सोमवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, माजी उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, सचिव रवींद्र जानकर, आदी पाचजणांचे शिष्टमंडळ सादर करणार आहे. त्यासाठी हे सर्वजण सोमवारी सकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. तीन तालुक्यांचा कायमचा विरोध सोलापूर जिल्ह्णातील सात तालुक्यांनी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचे ठराव दिले आहेत; परंतु सोलापूर शहर, अक्कलकोट व करमाळा या तिन्ही तालुक्यांनी ठराव देण्यास सुरुवातीपासून विरोध दर्शविला आहे. या तिन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन खंडपीठ कृती समितीने चर्चा केली; परंतु त्यांच्याकडूनही कायमचा विरोध असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)