शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या विसर्जनाची तयारी युद्धपातळीवर

By admin | Updated: September 7, 2014 00:43 IST

२२ सीसीटीव्ही कॅमेरे : ४ एलईडी स्क्रीन

कोल्हापूर : भक्ती, उत्साह आणि बंधुभाव यांचा त्रिवेणी संगम घडवून आणणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, सोमवारी होत असून आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची तयारी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. प्रशासकीय पातळीवर कोल्हापूर महानगरपालिकेने बाप्पांच्या विसर्जनाची, तर पोलीस दलाने मिरवणुकीतील बंदोबस्ताची जय्यत आखणी केली आहे. तथापि, या तयारीच्या कामावर गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने काही मर्यादा आणल्या आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी करवीरवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली तशी पावसानेही पुन्हा आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची काहीशी निराशा झाली. काल, शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस अखंडपणे सुरूच असल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर दोन दिवसांत भाविक बाहेर पडतील की नाही अशी शंकाच आहे.उद्या, सोमवारी गणेश विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. सर्व मंडळांबरोबरच संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष सोमवारच्या मिरवणुकीकडे लागले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या तयारीच्या निमित्ताने महानगरपालिकेची यंत्रणा गेल्या चार दिवसांपासून कामाला लागली आहे. सर्वप्रथम मनपा प्रशासनाने मिरवणूक मार्गावर मुरूम आणि खडीच्या सहायाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. दोन दिवसांत टाकलेला मुरूम पावसाच्या पाण्याने भिजला असून, त्यामुळे रस्ते अधिकच खराब व दलदलीचे बनले आहेत. सतत पाऊस कोसळत असतानाही महापालिका पवडी, विद्युत शाखेचे त्याचबरोबर महावितरणचे कर्मचारी मिरवणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. मिरवणूक मार्गावरील आडव्या येणाऱ्या विजेच्या तारा उंचीवर नेऊन जोडल्या आहेत. त्याचबरोबर नेहमीचे सोडियम दिवे वगळून जादा दिवे लावण्यात आले आहेत. पंचगंगा घाट व इराणी खण येथेही जादा पथदिवे लावण्यात आले आहेत. इराणी खण व त्याच्या शेजारच्या खणीत मूर्ती विसर्जित करण्याची सोय करण्यात आली असून, नव्या खणीच्या काठावर एक मोठा सिमेंटचा कठडा निर्माण करण्यात आलेला आहे.