शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साठविण्यासाठी पाटबंधारे सज्ज

By admin | Updated: December 23, 2014 23:48 IST

आजरा तालुका : ‘गजरगाव’ वगळता पाटबंधारेच्या सर्व बंधाऱ्यांची डागडुजी पूर्ण

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आजरा तालुक्यातील ‘गजरगाव’ वगळता सर्वच बंधाऱ्यांची डागडुजी पूर्ण झाली असून, उन्हाळ्यातील पिकांसह बागायत पिके व अनेक गावच्या पाणी योजनांना पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग सज्ज झाला आहे.उचंगी प्रकल्पांतर्गत तारओहोळ नाल्यावर असणारे हांदेवाडी, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, किणे, शिरसंगी, वाटंगी क्र. ७, ८, यमेकोंड क्रमांक ५, ६ व श्रृंगारवाडी हे दहा बंधारे जानेवारीअखेर उपलब्ध असतात. प्राधान्याने शेतीपिकांकरिता या पाण्याचा वापर होतो.बारमाही पाणीसाठा करणाऱ्या ऐनापूर, भादवण, चांदेवाडी, हाजगोळी बंधाऱ्यांपैकी ऐनापूर बंधाऱ्याची ४५ लाख रुपये, तर भादवण बंधाऱ्याची ५४ लाख रुपये खर्चून गतवर्षी दुरुस्ती करण्यात आली आहे. हाजगोळी बंधाऱ्याची ५० टक्के दुरुस्ती पूर्ण झाली आहे, तर ५० टक्के शिल्लक आहे.देवर्डे साळगाव व दाभिल बंधाऱ्यांचे पाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत उपलब्ध होते. १३व्या वित्त आयोगांतर्गत दाभिल बंधाऱ्याच्या पिल्लरच्या दुरुस्तीवर ४२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सद्य:स्थितीस खानापूर, धनगरवाडी, चित्री, यरंडोळ हे तलावही पूर्णक्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पाटबंधारेच्या अखत्यारितील धरणे व तलावांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना कोणताही धोका पाण्याअभावी होणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंधारे व तलावामध्ये १०० टक्के पाणीसाठा असल्याने या पाणीसाठ्यावर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग सुखावला आहे.वसुलीत पाटबंधारे विभाग आघाडीवरआजरा तालुक्यात बिगर सिंचन व सिंचन वसुलीत पाटबंधारे विभाग आघाडीवर आहे. ८५ टक्के वसुली आजतागायत पूर्ण झाली असून, कर्मचारी वर्गाचा पगार, बंधाऱ्यामध्ये बरगे घालणे-काढणे, आदींचा खर्च बाजूला केला तरीही पाटबंधारे विभाग फायद्यातच आहे.गजरगावला ‘ठेकेदार’ मिळेनागजरगाव बंधाऱ्याचे पिलर बाद झाले असून, बंधाऱ्याला गळती लागली आहे. दुरुस्तीसंदर्भात ४५ लाख रुपयांचे तीनवेळा टेंडर काढण्यात आले. मात्र, इतर बांधकामापेक्षा हे दर परवडणारे नसल्याने कोणीही ठेकेदार ‘टेंडर’ घेण्यास इच्छुक नसल्याचे पाटबंधारेचे शाखा अभियंता आर. ए. हारदे यांनी स्पष्ट केले.