शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘टीपूर’साठी गावांमध्ये जय्यत तयारी

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

कुंभारवाड्यात पणत्या : नौबतीच्या तालावर दीपोत्सवाला प्रारंभ

कुवे : टीपूर पाजळवायचा म्हटलं की, गावागावात भोपळ्याची शोधाशोध सुरु होते. कुंभारवाड्यात पणत्या वेगाने तयार होतात. देवाला तेलही येते. अवघे गाव काही तासात जमा होते. गावाला यात्रेचे रुप येते. नौबतीच्या तालावर दीपोत्सवाला प्रारंभ होतो. त्रिपुरारी पौर्णिमेलाच ‘टीपूर पौर्णिमा’ म्हटले जाते.एरव्ही देवळासमोर उभ्या असणाऱ्या दीपमाळा या त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने उजळून निघतात. तळकोकणातील प्रत्येक गावात टीपूर साजरा होतो. लांजा तालुक्यातील पूनस, उपळे, इंदवटी, इसवली, कोंड्ये आदींसह इतर गावात हा उत्सव साजरा होतो.कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. देवळात व घराबाहेर दिवे लावतात. देवस्थानच्या दीपमाळा पाजळणे, यालाच टिपूर पाजळणे, असे म्हणतात. कोकणात या उत्सवाचा दिमाख काही वेगळाच असतो. प्रत्येक ग्रामदेवतेला तेलाची आंघोळ घातली जाते. दीपांचा उत्सव करतानाच दीपमाळा प्रज्वलीत केल्या जातात. टीपराचा उत्सव म्हणजे गावातला मोठा उत्सव. बारा बलुतेदारांपैकी तेली मंडळी तेल घेऊन देवळात येतात. कुंभार पणत्या आणतात, शिंपी वाती आणतात आणि मग ढोलांचा गजर सुरु होतो. नौबत झडते तशी गावातली रयत एकत्र येते. टीपराच्या पूर्वसंध्येला समरत्वाचे प्रयोजन होते. डाळ, भाताची रानपानावर पंगत सुरु होते. त्यानंतर चंद्राच्या झगमगत्या प्रकाशात टीपूर सुरु होतो. मशाली फिरु लागतात, गावकरी पुढे येतात, तरंग हलू लागतात, गावात जल्लोष सुरु होतो. चंद्र वर येतो तसा उत्साह वाढतो. पाषाणांना तेलाची आंघोळ घातली जाते. प्रत्येक देवासमोर व मंदिरात दीपमाळावर पणत्या चढू लागतात आणि मग दीपोत्सवाला सुरुवात होते. (वार्ताहर)