इचलकरंजी : येथील महानगरपालिकेचा पहिला महापौर ठरविण्यासाठी बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सात नावांवर चर्चा झाली. त्यापैकी हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे आणि आवाडे गटाकडून उदय धातुंडे यांची नावे आघाडीवर आहेत.
त्यावर एकमत होत नसल्याने आज, गुरुवारी पुन्हा चर्चा करून उपमहापौर आणि विविध समित्यांचे सभापती निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्वांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासीयांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे पहिला महापौरपदाचा मान मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षण असल्याने कोणाची वर्णी लागणार, याबाबत पंचक्रोशीसह राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. सर्वाधिक ४३ जागा जिंकलेल्या भाजपमध्ये पहिला मान मिळविण्यासाठी अधिकजणांकडून मागणी आहे.
त्यामध्ये आवाडे आणि हाळवणकर गटातील नावांबाबत चर्चा करून एकमत करण्यासाठी मंत्री पाटील यांनी मिरज शासकीय विश्रामगृहात बुधवारी बैठक घेतली. बैठकीस आमदार राहुल आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.त्यामध्ये प्रदीप धुत्रे, उदय धातुंडे, तानाजी पोवार, नितेश पोवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते आणि रूपा बुगड यांच्या नावांबाबत चर्चा झाली. चर्चेतून धातुंडे आणि धुत्रे यांची नावे आघाडीवर आल्याचे समजते. त्यातील पहिला मान कोणाला द्यावा, याबाबत आवाडे आणि हाळवणकर गटात एकमत न झाल्याने या दोन्ही नावांबाबत प्रदेश समितीसोबत चर्चा करण्यासह गुरुवारी उपमहापौर आणि विविध समित्यांच्या सभापतींबाबत चर्चा करून अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे शुक्रवारीच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. घोषणेनंतर अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली असून, कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याकडे लक्ष लागले आहे.
शिव-शाहूकडून सयाजी चव्हाणशिव-शाहू आघाडीकडून महापौरपदासाठी सयाजी चव्हाण यांचे नाव निश्चित, तर उपमहापौरपदासाठी संगीता आलासे आणि रूपाली कोकणे यांची नावे चर्चेत आहेत.आजतागायत फक्त २ अर्जशिव-शाहूने बुधवारी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज देणे व भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजतागायत फक्त दोनच अर्ज नेण्यात आले आहेत.
Web Summary : Pradeep Dhutre and Uday Dhatunde are frontrunners for Ichalkaranji's mayor post. Final names will be announced Friday after discussions on deputy mayor and committee heads. Shiv-Shahu names Sayaji Chavan for mayor.
Web Summary : इचलकरंजी महापौर पद के लिए प्रदीप धुतरे और उदय धातुंडे सबसे आगे हैं। उप महापौर और समिति प्रमुखों पर चर्चा के बाद नामों की घोषणा शुक्रवार को की जाएगी। शिव-शाहू ने सयाजी चव्हाण को महापौर पद के लिए नामित किया।