शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

वीज दरवाढ; २७ मार्चला विधानभवनावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:12 AM

कोल्हापूर : शेतीपंपाची वीज दरवाढीविरोधात २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील लाखो शेतकरी धडक देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे मोर्चानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर

कोल्हापूर : शेतीपंपाची वीज दरवाढीविरोधात २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील लाखो शेतकरी धडक देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर शेतकरी जुन्या दरानेही वीज बिले भरणे बंद करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

प्रा. पाटील म्हणाले, महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज दरात १ रुपये १६ पैशांवरून १ रुपये ९७ पैसे इतकी दरवाढ केली. याविरोधात कोल्हापूर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला मानवी साखळी घालण्याचा इशारा दिला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी वेळ देण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७ जानेवारीला चर्चा करण्याची वेळ दिली; पण त्यादिवशी चर्चा झालीच नाही. त्यानंतर दि. २७ फेबु्रवारीपर्यंत वेळ दिली पण तीही तारीख होऊन गेल्याने आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही १.१६ रुपये दराने बिले भरत आहोत. यंदा अभूतपूर्व उन्हाळा राहणार आहे, अशा परिस्थितीत वीज तोडली तर पिके वाळून जातील याची चिंता आहे.

सरकार आमची दखल घेणार नसेल तर २७ मार्चला विधिमंडळावर राज्यातील शेतकरी धडक देतील. वेळप्रसंगी दोन दिवस त्याठिकाणी ठिय्या मारण्याची आमची तयारी असून जुल्मी दरवाढ मागे घ्यावीच लागेल.मुख्यमंत्र्यांनी कृषी संजीवनी योजना सुरू केली पण ती पुरती फसवी आहे. ‘महावितरण’ने १४० ते २७४ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ केल्याने पोकळ थकबाकी वाढली आहे. त्यावर कृषी संजीवनी योजना लागू करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही योजना फसली असून सात लाख शेतकºयांनी ३६१ कोटींची वसुली झाली आहे म्हणजे एकूण थकबाकीच्या ३.३ टक्के वसुली झाली. यासाठी पोकळ बिले दुरुस्ती करूनच खºया थकबाकीवर ही योजनेचा अंमलबजावणी केली पाहिजे, असे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील, आर. जी. तांबे, जे. पी. लाड, अरुण लाड, विक्रांत पाटील, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.थकबाकी कमी, तरीही...राज्यात वीज गळतीचे प्रमाण सर्वांत कमी व वसुलीत आघाडीवर कोल्हापूर जिल्हा आहे. सांगलीही त्यापाठोपाठ आहे, तरीही शासन शेतकºयांवर अन्याय करणार असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा प्रा. पाटील यांनी दिला.