शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सीमालढ्याला कोल्हापूरवासीयांचे बळ

By admin | Updated: January 18, 2017 01:02 IST

दीपक दळवी : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना बिंदू चौकामध्ये अभिवादन

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोल्हापूरवासीयांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचे हे ऋण आमच्या कायम लक्षात राहतील. गेल्या ६२ वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला यश येऊन आमची कर्नाटकी अन्यायातून मुक्तता होईल, असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी मंगळवारी व्यक्त केला.अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे बिंदू चौक येथे संयुक्त महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी सीमावासीयांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महापौर हसिना फरास, बेळगावचे आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणीकर, महेश जुळेकर, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, दिनेश ओऊळकर, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अशोकराव साळोखे, दीपा पाटील, शैलजा भोसले उपस्थित होत्या. दळवी म्हणाले, आॅक्टोबरमध्ये झालेल्या मराठा मोर्चात बेळगाववासीयांनीही सहभाग घेतला होता. यावेळीही संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. सीमावासीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कोल्हापूरकरांनी नेहमी आमची साथ दिली आहे. ही ताकद अशीच आमच्या पाठीशी राहू दे आणि लवकरात लवकर आमची या अन्यायातून मुक्तता व्हावी, अशी अपेक्षा आहे. प्रास्ताविकात संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ या विषयावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. १७ जानेवारी १९५६ रोजीच्या संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यातील हुतात्मे लक्ष्मण गावडे, मधू बांदेकर, महादेव बारागडी, पैलवान मारुती बेनाळकर, निपाणीमधील कमळाबाई मोहिते, कोल्हापूरचे शंकरराव तोरस्कर यांच्यासह १०५ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. बबनराव रानगे यांनी स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, कमलाकर जगदाळे, संभाजी चेंडके, संभाजीराजे जगदाळे, सुंदरराव देसाई यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.