शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाचीही कोअर बँकिंग प्रणाली

By admin | Updated: September 10, 2014 23:48 IST

९८ शाखा : खातेदारांना अधिक सुविधा

कोल्हापूर : विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या पोस्टाच्यावतीने कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे खातेधारकांना बँकांप्रमाणेच पोस्टाच्या देशभरातील कोणत्याही खात्यात व्यवहार करता येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टाच्या एकूण ९८ शाखा असून, शहरात ही सेवा येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे. सुरक्षित बचतीचा विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाकडे पाहिले जाते. अन्य कोणत्याही प्रकारच्या बचतीच्या पर्यायांपेक्षा व गुंतवणुकीपेक्षा पोस्टातील गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे आजही बहुतांश नागरिक पोस्टातील बचत खात्याला प्राधान्य देतात. पोस्टाच्यावतीने बचतीसह रिकरिंग, ठेव अशा विविध योजना ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, पोस्टात जाणे, पैसे भरणे, काढणे किंवा अन्य कागदोपत्री व्यवहारांची पूर्तता करणे हा प्रकार तसा वेळखाऊ आणि काही अंशी किचकट. आता मात्र पोस्टाचे हे रूपडे पालटणार आहे. कोल्हापुरातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये येत्या दोन महिन्यांत कोअर बँकिंग प्रणाली सुरू होत आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना बँकांप्रमाणे सोयीसुविधा मिळणार असून, खातेदारांना देशातील कोणत्याही खात्यात आपले व्यवहार करता येतील. तसेच ग्राहकांना एटीएम कार्डदेखील देण्यात येईल. यामुळे पैसे काढणे अधिक सुलभ होणार आहे. कोल्हापूर शहरात पोस्टाच्या १६ शाखा आहेत. शहर व जिल्हा मिळून एकूण ९८ शाखा आहेत. शहरात येत्या दोन महिन्यांत ही सेवा सुरू होईल. जिल्ह्यात मात्र १५ जून २०१५ पर्यंतही सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती सब-पोस्टमास्तर सुरेश मगदूम यांनी दिली. बॅलन्स तपासून घ्या...कोअर बँकिंग प्रणाली सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी आपल्या खात्यावरील बॅलन्स तपासून घ्यावा व त्याची नोंद आपल्या पासबुकामध्ये करून घ्यावी, असे आवाहन पोस्टाच्यावतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात येत्या दोन महिन्यांत आणि जिल्ह्यात १५ जून २०१५ पर्यंत पोस्टाच्या सर्व शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली सुरू होईल. तत्पूर्वी सर्व खातेदारांनी आपला बॅलन्स तपासून पाहणे गरजेचे आहे. नंतर त्यात काही दोष निघाला तर नोंद झालेल्या रकमेत बदल करता येणार नाही. - सुरेश मगदूम (सब-पोस्टमास्तर)