शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा साखर कारखान्यांवर ‘प्रदूषण’ची नजर

By admin | Updated: December 24, 2015 00:31 IST

स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा : दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यातील सहा कारखान्यांवर कारवाईच्या हालचाली

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांत प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी आॅनलाईन स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा (मॉनिटरिंग सिस्टीम) कार्यान्वित केली आहे. यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल उपलब्ध होणार आहे. दरम्यान, वारंवार सूचना देऊनही ही यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या सहा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने सुरू केल्या आहेत.पंचगंगा नदीकाठावर आठ साखर कारखाने आहेत. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ते पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे स्पष्टही झाले आहे. काही कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी पंचगंगा नदीत सोडल्याचेही यापूर्वी पुढे आले आहे. परिणामी कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी अनेक वेळा केली. मात्र ठोस उपाययोजना न केल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सुनावणीत न्यायालयाने ‘महसूल’च्या पुणे विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीकडून उपाययोजनांचाच एक भाग म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व २१ साखर कारखान्यांना प्रदूषणासंबंधीची आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची सूचना दिली. हंगाम सुरू करण्यापूर्वीच ही यंत्रणा बसवावी, असे लेखी कळविले. त्यानुसार पंधरा साखर कारखान्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कारखान्याच्या प्रत्येक क्षणाचा प्रदूषणाचा अहवाल मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वेबसाईटवर पाहता येत आहे. परिणामी प्रदूषणाला चाप बसण्यास मदत होत आहे.यंत्रणा काय आहे ?प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर संबंधित कारखाना स्थळावर जाईपर्यंत पुरावा मिळत नसे. म्हणून आॅनलाईन मॉनिटरिंगद्वारे हवा, पाणी यांच्या प्रदूषणावर नजर ठेवली जात आहे. या यंत्रणेची किंमत बारा लाख आहे. टॉवर आणि सेन्सरद्वारे हवा आणि कॅमेऱ्याद्वारे कारखान्यातून किती दूषित पाणी बाहेर पडते, त्यावर काय प्रक्रिया केली यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे प्रदूषणासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळणार आहे.प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी पंधरा साखर कारखान्यांनी आॅनलाईन मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा सर्वच कारखान्यांनी बसवावी, अशी सूचना दिली आहे. यंत्रणा न बसविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येईल.- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळतीन कारखान्यांचे दुर्लक्ष...गडहिंग्लज, तात्यासाहेब कोरे (वारणानगर), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) या कारखान्यांनी ही यंत्रणा बसविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. न बसविल्यास या कारखान्यांवर कारवाई होऊ शकते. उदयसिंग गायकवाड (शाहूवाडी), मंंडलिक (हमीदवाडा), भोगावती या कारखान्यांनी यंत्रणा बसविली आहे; पण कार्यान्वित केलेली नाही. कुंभी-कासारी, शाहू, गुरुदत्त, हेमरस, शरद, पंचगंगा, दत्त, आजरा, दालमिया, इको केन, डी. वाय. पाटील, सेनापती घोरपडे, महाडिक शुगर्स, जवाहर, राजाराम या कारखान्यांनी यंत्रणा बसवून कार्यान्वित केली आहे.