शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांसाठी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान

By admin | Updated: November 8, 2014 00:23 IST

सहकार आयोगाची चाचपणी : ‘गोकुळ’, जिल्हा बँकेवेळी वापर शक्य

प्रवीण देसाई -- कोल्हापूर -मतदान प्रक्रिया सुलभ व अचूक होण्याठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर झाला पाहिजे, असे मत जिल्हा निवडणूक विभागाने राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे व्यक्त केले आहे. मतदान, मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि मनुष्यबळाचा विचार करता या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करता येऊ शकतो का? याची चाचपणी आयोगाकडून सुरू आहे. याचा विचार झालाच तर आगामी ‘गोकुळ’सह जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत या प्रणालीचा वापर होऊ शकतो.गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राबविलेल्या चांगल्या यंत्रणेमुळे कोल्हापूरला राज्यात अव्वल स्थान मिळाले आहे. यामध्ये जिल्हा निवडणूक विभागाला केंद्र सरकारकडून पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले आहे. हेच अग्रस्थान कायम टिकवून ठेवून कोल्हापूरला आणखी पुढे नेण्यासाठी निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम मशीनचा वापर व्हावा, ज्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया अचूक व वेळेत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे मत जिल्हा निवडणूक विभागाने राज्य सहकार निवडणूक आयोगाकडे व्यक्त केले आहे. त्यामुळे याबाबत चाचपणी सुरू आहे.निवडणूक आयोगाकडून याचा विचार होऊन ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यास, आगामी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)सह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक (केडीसीसी), कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, बिद्री सहकारी साखर कारखाना, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, राजाराम सहकारी साखर कारखाना, आदी मोठ्या सहकारी संस्थांमध्ये याचा वापर निश्चितपणे केला जाऊ शकतो.मतपत्रिका (बॅलेट पेपर) मुळे मते बाद होण्याचे मोठे प्रमाण, मतमोजणीसाठी लागणारा प्रचंड वेळ आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ यांमुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया लांबते हे सर्वश्रुत आहे. ज्या निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर होतो, त्यामध्ये काही मते ही बाद होतातच, हा इतिहास आहे. एकही मत बाद न होता त्या मतदाराचा हक्क हा त्याला मिळालाच पाहिजे, या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ज्या-ज्या वेळी मतदानासाठी ‘ईव्हीएम’चा वापर झाला, त्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शन झाल्या असून, त्यांचे चांगले परिणाम या निवडणुकांमध्ये अनुभवायला मिळाले.मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वापर शक्यजिल्हा निवडणूक विभागाकडून मत व्यक्तराज्य सहकार निवडणूक आयोगाकडून चाचपणी