शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत एक-दोन जागांसाठी मतदान-ग्रामपंचायत निवडणूक : अन्य जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत एक किंवा दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. या जागांसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत एक किंवा दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. या जागांसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. या गावांमध्ये पाच ते आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागलेला असून त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सध्या ३८६ ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायतीतील लोकसंख्येनुसार येथील सदस्य संख्या ठरते. ही संख्या ५ ते अगदी १७ पर्यंतदेखील असते. या ४३३ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार २७ सदस्य असणार असून त्यापैकी ७२० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतींमध्ये एक, दोन किंवा फार तर तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. यात राधानगरीतील चार, गडहिंग्लजमधील एक, चंदगड, भुदरगड व पन्हाळ्यातील प्रत्येकी दोन दोन तर करवीर व गगनबावड्यातील एक -एक ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या गावांमध्ये पाच ते सहा सदस्य बिनविरोध आले आहेत. उर्वरित जागांसाठी दोन ते चार उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी दोन जागांवर एकाच व्यक्तीने अर्ज भरला आहे. या जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून १८ तारीखला मतमोजणी होणार आहे.

---

एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१ , बिनविरोध प्रभाग १४६

एकूण सदस्य संख्या : ४ हजार २७ , बिनविरोध सदस्य संख्या ७२०

--

दोन तीन जागांसाठी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

गावाचे नाव : बिनविरोध : निवडणूक लागलेल्या जागा

हरळी बुद्रुक (गडहिंग्लज) : ८ : १

पंडेवाडी (ता. राधानगरी) : ८ : १

ऐनी (ता. राधानगरी) : ६ : ३

चाफोडी तर्फ ऐनघोल (ता. राधानगरी): ४ : ३

सावर्दे वडाचीवाडी (ता. राधानगरी): ७ : २

बुक्कीहाळ (चंदगड) : ५ : २

चिंचणी (चंदगड) : ६ : १

निकमवाडी (पन्हाळा) : ६ : १

हरपवडे (पन्हाळा) : ६ : १

पाळ्याचाहुडा (भुदरगड) : ६ : १

हेळेवाडी (भुदरगड) : ५ : २

वेतवडे (गगनबावडा): ५ : २

नांगरगाव (भुदरगड ):४ : ३

दोनवडे (करवीर) : ४ : ३

--