पोलिस बंदोबस्तात आंबेओहळ प्रकल्पाच्या घळभरणी कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:41 IST2021-03-01T19:38:22+5:302021-03-01T19:41:57+5:30
Dam Kolhapurnews- कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

आंबे ओहळ प्रकल्प ता. आजरा. येथे २१ वर्षानंतर घळभरणीचे सुरु झालेले काम ( छाया : ऋतुजा फोटो )
रवींद्र येसादे
उत्तूर : कोणताही गाजावाजा न करता आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २१ वर्षांनंतर पोलिस बंदोबस्तात धरणाच्या घळभरणीस सुरुवात झाली आहे. जुनला पाणीसाठ्याचे नियोजन असून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. फक्त १० % टक्केच काम शिल्लक आहे.१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.कोल्हापूर पद्धतीचे बंधाराऱ्यांचे कामास प्रकल्पात पाणी साठा होणार असल्याने त्याचे ही काम गतीने सुरू झाले आहे.
०.५० मे. वॅट वीजनिर्मितीचे उदिष्ट असून त्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाचे डावे - उजवे तिरावरील काम पुर्णत्वाकडे आले आहे. पिचिंगचे १९ हजार स्वे. मीटर काम झाले अजून ४० हजार स्वे. मीटर काम बाकी आहे. घळभरणी साठी २ लाख ३६ घनमीटर मात काम होणार आहे.
जूनला कोणत्याही परिस्थितीत पाणी साठा होणार असल्याने पाटबंधारे विभागाने कामाची गती वाढवली आहे .एप्रिलअखेर हे काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जूनला पाणी साठा होणार आहे.
- के.एस बारदेस्कर.
प्रकल्पशाखा अभियंता
गरजेनुसार पोलिस बंदोबस्त
प्रकल्पाच्या कामात प्रकल्पग्रस्तांची आडकाठी नको म्हणून गरजेनुसार घळभरणीचे काम पुर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. प्रकल्प स्थळ सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भ्रगे, पोलिस निरीक्षक युवराज जाधव यांचे सह २५ पोलिस तैनात केले.
आधी पुर्नवसन मगच् घळभरणी असा कायदा असताना नियम मोडित काढून नेते मंडळी श्रेय घेण्याच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. धरण ग्रस्तांवर खोटे खटले घालून आंदोलकांवर पोलिस कारवाई केली जाते. हे योग्य नाही. कायदा धाब्यावर बसवून काम सुरू आहे.
शंकर पावले,
धरणग्रस्त आर्दाळ