Kolhapur: पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरी पोलिसांचा छापा, राऊंडसह अमली पदार्थांचा साठा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:29 IST2026-03-06T17:29:08+5:302026-03-06T17:29:18+5:30

परिसरात खळबळ

Police raid the house of pistol smuggler Manish Nagori, seized a stock of drugs including rounds | Kolhapur: पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरी पोलिसांचा छापा, राऊंडसह अमली पदार्थांचा साठा ताब्यात

Kolhapur: पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरी पोलिसांचा छापा, राऊंडसह अमली पदार्थांचा साठा ताब्यात

यड्राव : येथील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरी इचलकरंजी शहरातील गोळीबारप्रकरणी शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत राऊंड व अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. यामुळे इचलकरंजी शहर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनीष नागोरी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.

बुधवारी इचलकरंजी शहरामध्ये सांगलीतील गुन्हेगार ओंकार कांबळे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या अनुषंगाने यड्राव येथील पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पिस्तुलाचे राऊंड व अमली पदार्थाचा मोठा साठा सापडला. याचा पंचनामा करून पोलिसांनी एक दुचाकी व चार चाकी वाहन जप्त केले.

मनीष नागोरी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चक्कर आल्यामुळे उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांना विचारले असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती देत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यासह शहापूर पोलिस व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title : कोल्हापुर: मनीष नागोरी के घर पर पुलिस का छापा, गोला-बारूद, ड्रग्स जब्त।

Web Summary : पुलिस ने यड्राव में मनीष नागोरी के आवास पर छापा मारा, इचलकरंजी गोलीबारी से जुड़े गोला-बारूद और ड्रग्स जब्त किए। हिरासत में बीमार पड़ने के बाद नागोरी को अस्पताल में भर्ती कराया गया। जांच जारी है।

Web Title : Kolhapur: Police raid Manish Nagori's house, seize ammunition, drugs.

Web Summary : Police raided Manish Nagori's residence in Yadrav, seizing ammunition and drugs related to the Ichalkaranji shooting. Nagori was hospitalized after falling ill during custody. Investigation ongoing.