याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हासुर्ली येथे पोलीसपाटील म्हणून कार्यरत असलेले सावंत काल गावातील ज्योतिर्लिंग सार्वजनिक मंडळ व विठ्ठलाई मंडळ यांच्या गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यावर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले असून, मिरवणूक काढू नका, असे सांगत होते; मात्र माजी सरपंच असलेले संभाजी कृष्णा वडाम यांनी त्यांना तू आम्हाला कोण सांगणार, असे म्हणून धक्काबुक्की करत त्यांची गळपट्टी धरली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, अशी फिर्याद दाखल झाली. राधानगरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. दिवाणी न्यायालयातून आज त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्यांची बिंदू चौक कारागृहात रवानगी करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}