Kolhapur: कळंबा गॅस स्फोटातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:50 IST2025-09-16T15:50:38+5:302025-09-16T15:50:57+5:30
गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध सुरू

Kolhapur: कळंबा गॅस स्फोटातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
कोल्हापूर : कळंबा येथे मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस स्फोटप्रकरणी अटकेत असलेला सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचा कर्मचारी महम्मदहुजरे हबीबुररहेमान हुजरेअली (वय ३०, सध्या रा. राजारामपुरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली.
वाचा- गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'
जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी (दि. १२) अटक केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.
त्यानुसार त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ झाली. या गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.