शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस’ची ‘साईनाथ’वर मात

By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST

केएसए लीग फुटबॉल : शिवाजी विरुद्ध बालगोपाल लढत १-१ बरोबरीत

कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल सामन्यात आज, बुधवारी कोल्हापूर पोलीस संघाने नवख्या साईनाथ स्पोर्टस्वर २-० अशी मात केली, तर दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला. छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेतील दुपारच्या सत्रातील पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोलीस संघाने सामन्यावर वर्चस्व ठेवले. १४व्या मिनिटास पोलीस संघाकडून सागर भोसले याने गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात साईनाथकडून प्रशांत टिपुगडे, मनोज अधिकारी, अभिजित चौगुले यांनी सामना बरोबरीत आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अनुभवी पोलीस संघाच्या बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पोलीस संघाकडून आघाडी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. ६४व्या मिनिटास पोलीस संघाचा सुनील घुमाई याने मैदानी गोल नोंदवीत २-० अशी आघाडी वाढविली. पोलीसकडून रोहित ठोंबरे, निखिल साळोखे, नितीन रेडेकर, विनायक चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामना २-० असा एकतर्फी जिंकला.दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ या दोन तुल्यबळ संघांत झाला. सामन्याच्या सातव्या मिनिटास बालगोपालच्या अभय संभाजी याने पहिला गोल नोंदवीत १-० अशी आघाडी घेतली. ‘शिवाजी’कडून शिवतेज खराडे, आकाश भोसले, स्वप्निल पाटील, तेजस शिंदे, राकेश कुमार, अमृत हांडे, सागर भातकांडे यांनी अनेक चाली रचल्या. मात्र, ‘बालगोपाल’च्या सजग बचावफळीने त्या परतावून लावल्या. बालगोपालकडून बबलू नाईक, जयकुमार पाटील, ऋतुराज पाटील, सचिन गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ करीत आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात जादा मिळालेल्या दोन मिनिटांत अर्थात ४२ व्या मिनिटाला शिवाजीकडून आकाश भोसलेच्या पासवर सागर भातकांडेने अप्रतिम गोलची नोंद करीत १-१ अशी बरोबरी केली. उत्तरार्धात शिवाजीकडून आकाश भोसले, तेजस शिंदे, राकेशकुमार, जितेंद्र मोहन, अनिरुद्ध शिंदे, अमृत हांडे यांनी गोल करून आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. बालगोपालकडून बबलू नाईक, जयकुमार पाटील, सचिन गायकवाड रोहित कुरणे यांनी अनेक खोलवर चढाया केल्या. त्या परतावून लावताना ‘शिवाजी’चा गोलरक्षक गुरुदेवसिंग बलबीर याच्या अनुभवाचा कस लागला. त्याने बालगोपालच्या अनेक चढाया रोखल्या. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आक्रमण-प्रतिआक्रमण करीत आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही संघांना अखेरपर्यंत यश आले नाही. त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत राहिला. (प्रतिनिधी)आजचे सामनेदुपारी २-०० वा. खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ)दुपारी ४-०० वा. संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस्